Sign In New user? Start here.

 
 
zagmag

भारतातील एकमेव तालवाद्यांचा महोत्सव - तालचक्र

सूर, ताल आणि लय या त्रिवेणी संगमातून संपूर्ण संगीत निर्माण होते. यातील मैफलींचा आनंद आपण वारंवार घेत असतॊ. परंतु तालचक्रच्या माध्यमातून वर्षातून एकदाच वैविध्यपूर्ण ताल वा ताल वाद्यांची मेजवानी रसिकांना मिळते. यंदा तोच रोमांचित करणारा माहोल आणि तालाव्दारे मंत्रमुग्ध होण्याची संधी तालचक्र २०१५ व्दारे दि. ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी ६ वाजता गणेश कलाक्रीडा मंच, पुणे येथे रसिकांना मिळणार आहे. विख्यात तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकार होणा-या चौथ्या तालचक्र महोत्सवात यंदा वैविध्यपूर्ण तालांच्या मेजवानी बरोबर सूर, लय, ताल असा त्रिवेणी संगमही अनुभवायला मिळणार आहे.

तसेच यंदाचा चौथा तालरत्न पुरस्कार ज्येष्ठ तबला वादक पंडित स्वपन चौधरी यांना प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ घट्टम वादक विव्दान विकू विनायकराम यांच्या हस्ते हा गौरव करण्यात येणार असून स्मृतीचिन्ह आणि एक लाख रूपये असे पुरस्कारचे स्वरूप आहे. केवळ ताल, तालवाद्य यांना समर्पित असा व तालयोगींचा गौरव करणारा तालचक्र हा एकमेव महोत्सव आहे. दरवर्षी यंदाही विविध ताल वाद्यांची मैफल येथे जमणार असून यूरोप आणि अमेरिकेतील ६ कलाकारांच्या "स्वीडीश फोक ग्रुपचे" वादन हे यंदाचे वैशिष्ट असणार आहे. शिवाय अनेक दिग्गज कलाकारांचे वादन ऎकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

महोत्स्वाची सुरूवात (शुक्रवार, दि.३० जानेवारी) ज्येष्ठ मेंडेलीन वादक स्वर्गिय यांना श्रध्दांजली अर्पण करून करण्यात येणार आहे. त्यांचे बंधू मेंडोलीन य़ू राजेश यांच्या वादनाने सुरूवात होईल. महोत्सवात पहिल्याच दिवशी रसिकांना सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम बघायला मिळणार आहे. पंडित विजय घाटे (तबला), राजेश वैद्य (इलेक्ट्रॉनिक विणा), मेंडोलीन यू राजेश (मेंडोलीन), जॉर्ज ब्रुक्स USA (सॅक्सोफोन), श्रीधर पार्थसारथी (मृदंगम), मुकूल डॊंगरे (ड्रम्स), अरूण कुमार (ड्रम्स), शितल कोलवालकर (कथ्थक), मानसी तापीकर-देशपांडे (कथ्थक), शमा भाटे (कथ्थक नृत्यदिग्दर्शन), अतुल रणिंगा (किबोर्ड) आणि रूपकुमार राठोड (गायन) हे संगीताचा एक अप्रतिम गुलदस्ता रसिकांना पेश करणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे ताल संयोजन पंडित विजय घाटे करणार आहेत.

दुस-या दिवशी (शनिवार ३० जानेवारी) पश्चात्य आणि भारतीय संगीताचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. यावेळी जॅज कलाकार जॉर्ज ब्रक्स यांचेही सादरीकरण होणार आहे. याच दिवशी पंडित स्वपन चौधरी यांना तालरत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात येईल. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी (रविवार १ फेब्रुवारी) विव्दान मनारगुडी वासूदेवन, सुखविंदरसिंग नामधारी या दिग्गजांच्या कलेचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. वासुदेवन हे पुण्यात पहिलांदाच आपली कला सादर करणार असून त्यांचे तवील हे दाक्षिणात्य वाद्य अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. तर सुखविंदरसिंग नामधारी यांच्या तबल्याचे बोल जवजवळ २०-२५ वर्षानंतर पुण्यात दूमदूमणार आहेत. महोत्सवाची सांगता प्रसिध्द वादक ए. सिवामणी यांच्या वादनाने होणार आहे. त्यांच्याबरोबर सुफि व गझल गायिका रूणा रिझवी, तबलावादक ऒजस अधीया आणि किबोर्ड वाद्क विशाल धुमाळ हे सहभागी होणार आहेत.