Sign In New user? Start here.

 
 
zagmag

खानदेश च्या अमिताभ बच्चन ने पुण्यात उडविली धमाल ….

पुणे येथे एस एम जोशी सभागृहात चक्क 'बिग बी ' अवतरले आणि सभागृहात एकच एकच कल्ला उडाला , या बिग बी ने मोठ्ठी धमाल रसिकांसमवेत उडविली … नाटक - सिनेमा यासह नृत्य , संगीत एकपात्री अशा सर्व कला क्षेत्रातील जाणकारांना , वैशिष्ट्यपूर्ण कलाकारांना , ज्येष्ठ रंगकर्मींना सन्मानित करून , त्यांच्या आणि नवोदितांच्याही कलाविष्काराचे कार्यक्रम सातत्याने सादर करून 'सलाम पुणे' या संस्थेने महारष्ट्रातील कला व संस्कृती जोमाने पुढे नेण्याच्या चळवळीला लक्षणीय गती दिली आहे त्यामुळे या संस्थेलाच आम्ही सलाम करतो अशी भावना येथे काल मराठी रंगभूमी दिन सोहळ्यात या बिग बी ने म्हणजे ज्युनिअर अमिताभ बच्चन अर्थात शशिकांत पेडवाल यांनी व्यक्त केली .

'मिस्टर अन्ड मिसेस' आणि 'अलिबाबा आणि चाळीशीतले चोर' या दोन नाटकांना यावेळी सर्वोत्कृष्ट नाटकांचे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले तर पुण्यातील प्रसिध्द गायक चन्द्रशेखर महामुनी आणि जळगावचे ज्यु. अमिताभ बच्चन - शशिकांत पेडवाल यांना आणि पुण्यातील एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांना 'सलाम ' पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आनंद इंगळे , विद्याधर जोशी चिन्मय मांडलेकर , मधुरा साटम , अभिजित साटम , अजित भुरे , प्रियदर्शन जाधव , तसेच अनिरुद्ध जोशी, अजित भुरे .ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार निर्माता निलेश नवलाखा , अभिनेत्री डिम्पल चोपडे , मयुर लोणकर , दिग्दर्शक शिव कदम . दीपक सवाखंडे , वैभव पगारे , अभिनेत्री पूजा पुरंदरे . अभिषेक लोणकर , उषा शेट्टी , अनिल सोनपाटकी, हर्षित अभिराज,आदी रामचंद्र , निखिल महामुनी , भाग्यश्री पेंध्ये , सोनिया बर्वे 'प्रेमाचे साईड इफेक्ट ' चे निर्माते विलास मेहेर , दिग्दर्शक कौस्तुभ कुलकर्णी ,आदी कलावंत उपस्थित होते.

चंद्रशेखर महामुनी यांनी आपल्या खास अदाकरीत देव आनंद यांच्यावर चित्रित झालेली गाणी सादर करून प्रेक्षकांची वाहव्वा मिळविली तर भाग्यश्री पेंध्ये आणि अनुप कुलथे यांनी तबला आणि व्हायोलीन ची जुगलबंदी सादर केली ज्यु. बिग बी ने तर कार्यक्रमात धमाल उडविली . त्यांनी हॉट सीटवर केलेली प्रश्नोत्तरे आणि अमिताभ यांचे विविध चित्रपटात सादर केले संवाद , गणनी यामुळे रसिकांनी अक्षरशः प्रेक्षागृह डोक्यावर घेतले .रेखा -जया बच्चन पासून ते अभिषेक -ऐश्वर्या पर्यंतच्या बहारदार गप्पा त्यांनी येथे रसिकांशी केल्या आणि सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर यांनी या कार्यक्रमाचे विशेष आयोजन आणि संयोजन केले.