Sign In New user? Start here.

गोष्ट तशी गमतीची आणि एक हजाराची नोट ने मारली बाजी

 
 
zagmag

गोष्ट तशी गमतीची आणि एक हजाराची नोट ने मारली बाजी

'मी आजवर जे काही बरं का केलं त्याला प्रोत्साहन दिलं, कौतुक तुम्ही माय बाप रसिकांनी केलं आणि माझा आत्मविश्वास वाढवला. मी खरच तुम्हा संवांची खूप ऋणी आहे. काहीही कळत नसताना कला क्षेत्रात आल्यावर मिळालेला सगळ्याचा पाठींबा खूप आधार देणारा होता. आज वर अनेक पुरस्कार मिळाले पण संस्कृती कलादर्पण कलागौरव पुरस्कार २०१५ घेताना विशेष आनद होतोय. याच वर्षी माझ्या मराठी चित्रपट कारकिर्दीला ५० वर्ष पूर्ण झाली. जेंव्हा एखाद्या कालाक्राला पुरस्कार मिळतो तो त्याच्या एकट्याचा कधीच नसतो. त्याच्यामागे अनेकांचे आशीर्वाद, सहकार्य आणि प्रेम असत. माझ्या बाबतीही तसच आहे. माझी आई, भाऊ अनिल काळे आणि पती कै.माधव पांडुरंग नाईक याच्या लाभलेल्या साथीने मी एक संपन्न कलाकर होऊ शकले आशी प्रांजळ कबुली आशा काळे यांनी दिली.

त्याच बरोबर माझ्या ५० वर्षांच्या कारकीर्दीचा जल्लोष संस्कृती कलादर्पण सोबत आणि माझ्या चाहत्यांसोबत करतेय याचं मला खूप समाधान असल्याचाही आशाताई म्हणाल्या. अर्चना नेवरेकर फौंडेशन प्रस्तुत संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१५ हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळ्यात संस्कृती कलादर्पण संस्थेच्या अध्यक्ष अर्चना नेवरेकर आणि संस्थेचे संथापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांच्या हस्ते संस्कृती कलादर्पण कलागौरव हा पुरस्कार ज्येष्ठ कलावंत आशा काळे यांना प्रदान करण्यात आला.नाटक चित्रपट आणि मालिका अशा एकूण तीन विभागात पुरस्कार विभागून देण्यात आहे. त्यातील नाटक विभागात गोष्ट तशी गमतीची, चित्रपट विभागात एक हजाराची नोट आणि मालिका विभागात कमला या मालिकेने अधिका अधिक पुरस्कारावर आपले नाव कोरले.

पुरस्कार वितरणाबरोबरच कलावंतांच्या धमाल परफॉर्मनस मुळे सोहळ्याला चार चांद लागले. संस्कृती बालगुडेच्या कार्निव्हल डान्स वर सारेच थिरकले तर मानसी नाईक आणि आरती सोळंकी यांच्या परफॉर्मनसला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. कमलाकर सातपुते, सुप्रिया पठारे, आणि अंशुमन विचारे यांनी सोळाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या किशोर वयीन मुलाच्या मानसिकतेचा वेध घेणारे पप्रहसन प्रेक्षकांनी मालापासून अनुभवले. हलक्या पुलक्या विनोदांनी उडणारी हास्याची कारंजी नक्कीच उल्लेखनीय होती.