Sign In New user? Start here.

संतोष जुवेकर ने गाजविली पुण्याच्या गणेशोत्सवातील मंगळवारची रात्र

 
 
zagmag

संतोष जुवेकर ने गाजविली पुण्याच्या गणेशोत्सवातील मंगळवारची रात्र

भूक लागली, संत्याने (अभिनेता संतोष जुवेकर) जोगेश्वरी बोळात वडापाव खाल्ला , मंडई मध्ये बंदुकीने फुगे फोडले … मध्येच मिनरल वॉटर च्या बाटल्या घेत पाण्याने तहान भागविली आणि चेहरा स्वछ केला …मंगळवारची रात्र हजारो भाविकांनी संत्या च्या या अदाकारीबरोबर गणेश उत्सवात गणेश दर्शनासह एन्जॉय केला . महिला पोलिसांसह , तरुणाई , कित्येक ठिकाणी वाहिनी काकू , लहान बालकांनी ' बायकर्स अड्डा ' च्या कलावंतासमवेत धमाल केली . हि धमाल करीत असताना संतोष जुवेकर ने , तुळशीबाग गणपती , कसबा गणपती , गुरुजी तालीम , अशा अनेक ठिकाणी गणेश मंडळे , कार्यकर्ते , भाविक यांना दुष्काळग्रस्तांची आठवण ठेवा , मिरवणुकीत अचकट विचकट गाण्याना फाटा देत , गणेश भक्तीची धूम माजविणारी गाणी लावा , गैरप्रकारांना आळा घाला अशी आवाहने केली आणि ' बायकर्स अड्डा ' या सिनेमाच्या वतीने मनाचा पहिला गणपती कसबा गणपती येथे दुष्काळ ग्रस्तांसाठी आर्थिक मदत हि रोख स्वरुपात दिली.

मराठी कलाकारांचा करिष्मा काय आहे ? रसिक आणि गणेश भाविकांच्या मनात कलाकारांच्या बद्दल किती आकर्षण आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी अचंबित करणारी अनुभूती ' बायकर्स अड्डा ' या आगामी मराठी सिनेमाच्या 'संतोष जुवेकर , तन्वी किशोर , देवेंद्र भगत , अनिरुद्ध हरीप , राहुलराज डोंगरे, ऋषी मांडके आदी कलावंतांनी रात्री जेव्हा गणेश उत्सवात गणेश दर्शनासाठी सर्वत्र पायी फिरत रात्र जागविली तेव्हा आली . बायकर्स अड्डा 'चे निर्माते विजय हरिया , प्रमोद लोखंडे, दिग्दर्शक राजेश लाटकर त्यांच्या समवेत होते . अखिल मंडई मंडळ,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ,निंबाळकर तालीम मंडळ , मनाचे तुळशीबाग गणपती , गुरुजी तालीम गणपती , तांबडी जोगेश्वरी गणपती , कसबा गणपती , आदी मंडळांना कलावंतांच्या या टीम ने भेटी दिल्या गणपतीची आरती केली आणि भाविकांशी संवाद साधला . यावेळी भाविकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे सारे कलावंत हि भारावून गेले होते