Sign In New user? Start here.

 
 
zagmag

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव ११ ते १४ डिसेंबर दरम्यान

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव भारतीय अभिजात संगीताची परंपरा जपणारा असा हा महोत्सव . या वर्षी ११ ते १४ डिसेंबर दरम्यान होणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या या महोत्सवाचे यंदाचे हे ६२ वे वर्ष आहे. या महोत्सवाच्या तारखांची घोषणा मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी केली.

महोत्सव नेहमीप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे रंगणार आहे. २०११ मध्ये पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर या महोत्सवाचे "सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव‘ असे नामकरण करण्यात आले. गुरू आणि शिष्य यांच्या नावाने होणारा हा भारतातील एकमेव संगीत महोत्सव आहे.

जुन्या आणि नव्या पिढीच्या कलाविष्काराची मेजवानी यंदाही रसिकांसाठी असणार आहे. कार्यक्रमाची इतर माहिती आणि सहभागी गायक, वादक, नर्तक यांचा तपशील मंडळातर्फे पुढील महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. .