Sign In New user? Start here.

सिद्धेश पैनी आपल्या स्ट्रगल च्या जोरावर गाठलं युएसए

 
 
zagmag

सिद्धेश पैनी आपल्या स्ट्रगल च्या जोरावर गाठलं युएसए

मेहनत आणि जिद्दीने आवडीचं काम केल्यास यश मिळवलं जाऊ शकतं हे डान्स इंडिया डान्ससारख्या रिअॅलिटी शोमधून प्रकाशझोतात आलेल्या सिद्धेश पै ने सिद्ध केलंय. डान्स इंडिया डान्सच्या पहिल्या सीझनपासून आपल्या वेगळ्या डान्स शैलीने ओळखल्या जाणा-या सिद्धेशला त्याच्या आवडत्या ड्रिम स्टारला कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली आहे. सिद्धेशला अभिनेता गोविंदा यांना कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली आहे. डिआयडीच्या पहिल्या सीझनपासून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा सिद्धेश डिआयडीनंतर यशाची एक एक शिखरे गाठत आहे. त्याने डिआयडी सुपर मॉम स्पर्धेत दोनदा विजय मिळवला आहे. इतकेच नाहीतर त्याची लोकप्रियता इतकी वाढली की, वेगवेगळ्या कार्यक्रमांची कोरिओग्राफी करण्यासाठी त्याला बोलवले जाऊ लागले. दरम्यान, समीत कक्कड यांच्या ‘आयना का बायना’ या सिनेमातही त्याला मुख्य भूमिका करायला मिळाली. डान्सवर आधारीत हा सिनेमा असल्याने त्याने इथेही आपलं वेगळेपण सिद्ध केलं. या सिनेमासाठी त्याला पुरस्कारही मिळाला.

हे सगळं सुरू असताना त्याचं स्वप्न मात्र अपूर्णच होतं. ते म्हणजे अभिनेता गोविंदा यांना कोरिओग्राफ करण्याचं स्वप्न. बहुदा गोविंदाला कोरिओग्राफ करण्याचं स्वप्न प्रत्येक डान्सरचं असेल. तसंच सिद्धेशचंही हे स्वप्न होतं. जे आता पूर्ण झालं आहे. एका इंटरनॅशनल शोमध्ये सिद्धेशला गोविंदाला कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली. आपल्या डान्स आयडलला कोरिओग्राफ करायला मिळाल्याने सध्या सिद्धेश सातव्या आसमानवर आहे. सिद्धेश दिवसेंदिवस यशाची पायरी गाठत असून नालासोपारापासून सुरू झालेला त्याचा हा प्रवास अमेरिकेपर्यंत पोहचला आहे. सध्या सिद्धेश अनेक कामे एकत्र करत असून निशांत सपकाळे यांच्या ‘ढिंगचॅक एन्टरप्राईजेस’ या मराठी सिनेमात तो एक छोटी भूमिका करणार आहे. शिवाय मुंबई, पुणे, दिल्ली येथे वेगवेगळ्या वर्कशॉपमध्ये सिद्धेशला बोलवले जात आहे. तर अमेरिकेतीलही एका २० दिवसांच्या वर्कशॉपसाठी त्याला बोलवण्यात आले आहे.

म्हणजे त्याचं काम आता इंटरनॅशनल स्तरावर गेलंय. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश गाठलं आहे. यश मिळवता मिळवता आपल्या आयडलला कोरिओग्राफ करण्याची संधी त्याला मिळल्याने सोन्याहून पिवळे अशी त्याची अवस्था झाली आहे. दरम्यान, वेगवेगळ्या माध्यमांमधून समोर येत असलेला सिद्धेश एक अभिनेता आणि एक डान्सर म्हणून दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. त्याचं काम लोकांनाही आवडतं आहे. सोशल मिडियात त्याला त्याच्या चाहत्यांकडूनही नेहमीच त्याच्या कामाची पावती मिळाली आणि मिळत आहे.