Sign In New user? Start here.

स्मिता पाटील यांची 59वी जयंती

 
 
zagmag

स्मिता पाटील यांची 59वी जयंती

आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवणा-या दिवंगत अभिनेत्री 'स्मिता पाटील' यांचा आज वाढदिवस .17 ऑक्टोबर 1955 रोजी जन्मलेल्या स्मिता पाटील यांनी वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

आपल्या अभिनायाने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवल. स्मिता पाटील यांचे चित्रपट करकिर्द खूप छोटे होती. मात्र या काळात त्यांनी अनेक उत्कृष्ट सिनेमे दिले.फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटमधून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही वर्षे दुरदर्शनवर न्यूज रिडर म्हणून काम केले होते. याचकाळात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी स्मिता यांना आपल्या 'चरणदास' या सिनेमासाठी साइन केले. 1975 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाद्वारे स्मिता यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

स्मिता पाटील यांनी राज बब्बर यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांच्यावर घर तोडण्याचा आरोप लावण्यात आला. मीडियातसुद्धा त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. 1986 मध्ये मुलगा प्रतिक बब्बरला जन्म दिला. मात्र मुलाच्या जन्मानंतर दोन आठवड्यांतच त्यांचे निधन झाले.

1975 ते 1985 या दहा वर्षांत स्मिता पाटील हिंदी सिनेसृष्टीतील मोठे नाव बनले होते. मंथन (1977), भूमिका (1977), आक्रोश (1980), बाजार (1982), नमक हलाल (1982), अर्थ (1982), मंडी (1983), मिर्च मसाला (1985) यांसारखे अविस्मरणीय सिनेमे त्यांनी दिले. हिंदीसह मराठी, पंजाबी आणि मल्याळम सिनेमांमध्ये त्यांनी काम केले.