Sign In New user? Start here.

 
 
zagmag

स्टायलिश सोनालीचे ऑटम विंटर कलेक्शन

आपल्या हटके फॅशनचे कलेक्शन चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा बॉलिवूड फंडा आता मराठी इंडस्ट्रीतही येऊ घातला आहे. याची सुरुवात स्वप्नील जोशीने आपले स्वप्नील रेकमेंड्स या नावाने क्लॉथिंग सादर केले. आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी विशेष प्रसिद्ध असलेली मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही देखील आपले फॅशन फंडे चाहत्यांसाठी खुले केले आहे.

जीसिम्सचे कार्तिक निशानदार आणि अर्जुनसिंग बर्हान यांच्या प्रयत्नांमुळे आणखी एका मराठी कलाकाराचे क्लोथिंग ब्रँड आपल्याला बाजारात पाहायला मिळणार आहेत. आजच्या तरुणाईला आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने वेड लावणारी सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रींने नुकतेच ठाणे येथील विवियाना मॉलच्या मॅक्स स्टोअरमध्ये मॅक्सच्या ऑटम विंटर कलेक्शन लाँच केले. यावेळी सोनालीने क्लॉट्स आणि जॅकेट्स घालून रॅम्प वॉकही केला तसेच मॅक्सच्या ऑटम विंटर कलेक्शनचं लुकबुकही लाँच केले.

"मी आज मॅक्सचं कलेक्शन लाँच करतेवेळी मॅक्सच्या स्टायलिश तसेच कंफर्टेबल असलेल्या क्लोट्स आणि जॅकेट्सची निवड केली. मॅक्सचे आउटफिट्स मला कायम आवडतात आणि याच ब्रॅण्डला मी प्रेझेंट करते आहे याचा मला खूप आनंद होतो आहे. मॅक्सच्या बोहेमिन कलेक्शनचं लुकबुकमध्ये माझ्या आवडीचे कलेक्शन आहेत, मी जीसिम्सची खूप आभारी आहे. त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे मी आज मॅक्सचं ऑटम विंटर लुकबुक लाँच करते आहे.", असे सोनालीने यावेळी सांगितले. सोनालीने रिव्हिल केलेलं ऑटम विंटर कलेक्शन मॅक्सच्या सर्वत्र स्टोअरमध्ये चाहत्यांसाठी खुले करण्यात आले आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणा-या सोनालीचा चाहतावर्ग मोठा आहे.सोनाली कुलकर्णी या पहिल्याच मराठी अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांसाठी विंटर कलेक्शन लाँच केले आहे. तिच्या स्टाईलची क्रेज आज तरुणींमध्ये जास्त असल्याकारणामुळे मॅक्स स्टोअरमध्ये होत असलेल्या ऑटम विंटर कलेक्शनला चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.