Sign In New user? Start here.

 
 
zagmag

सिनेस्टार बनणार क्रिकेटस्टार

सातारा ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. आता याच साताऱ्याने नव्या युगासोबत वाटचाल सुरु केली असून साताऱ्यातून अनेक प्रथितयश कलाकार तयार झाले आहेत. नेहमी मनोरंजन करणारे हे कलाकार सातारकरांसमोर क्रिकेटचे खेळाडू बनून येत आहेत. त्यांच्या संघाचे नाव आहे अजिंक्यतारा सातारा. ह्या संघाचे संघमालक श्री. सतीश मोतलिंग आणि सेजल शिंदे असून त्यांच्या क्षत्रिय प्रोडक्शनने निर्माण केलेला " ३५% काठावर पास " लवकरच प्रदर्शित होत आहे. अजिंक्यतारा सातारा संघातून सागर कारंडे, प्रथमेश परब, चंद्रकांत कणसे, तेजपाल वाघ, केतन पवार, अमोल गोळे, निखिल पवार, स्नेहल गोरे असे कलाकार खेळतील. प्रतिभावान लेखक आणि अभिनेते तेजपाल वाघ हे ह्या संघाचे कर्णधारपद सांभाळत असून धैर्यशील मोहिते - पाटील यष्टीरक्षकाची भूमिका निभावतिल.

तसेच नितीन दिक्षित, सचिन मोटे, बाळकृष्ण शिंदे, स्मिता तांबे , किरण माने, रेश्मा शिंदे, वासू पाटील हे ह्या वर्षी जरी मैदानात नसले तरी संघाच्या पाठीशी उभे राहून खेळाची रंगत वाढवणार आहेत. ह्या संघाची पहिली लढत दि. ४ मे रोजी सायं. ५.३० वा. शाहू मैदान, कोल्हापूर येथे ' फटाका औरंगाबाद' ह्या संघाशी झाली.