Sign In New user? Start here.

ज्युक बॉक्स- भप्पी लाहिरी स्पेशल चे आयोजन

 
 
zagmag

ज्युक बॉक्स- भप्पी लाहिरी स्पेशल चे आयोजन

ज्युक बॉक्स अंतर्गत विविध संगीतकार, त्यांची गाजलेली गाणी, त्यांच्याबरोबर अनेक वर्षे काम करूनही प्रसिध्दीपासून दूर राहिलेले वादक कलाकार, तंत्रज्ञ मंडळी ह्यांना एकत्र व्यासपिठावर आणून प्रेक्षकांना सुरेल संगीताबरोबरच त्यांच्या कारकिर्दीत, संगीतकारांबरोबर काम करतानाचे आलेले अनुभव, अनेक किस्से, एखाद्या गाण्याला चाल लावताना घडलेले प्रसंग असा गाणी आणि गप्पांचा अनोखा मिलाफ असलेली संगीत रजनी "ज्युक बॉक्स- भप्पी लाहिरी स्पेशल" शनिवार दि २१ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वा. पिंपरी-चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

अनय पोखलेकर, समीर पारसनीस, प्रशांत साळवी आणि नितीन गायकवाड या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या चारही मित्रांनी केवळ संगीतावर प्रेम या एकच भावनेतून एकत्र येऊन आजपर्यंत आर.डी.बर्मन, कल्याणची-आनंदजी अशा अनेक लोकप्रिय व प्रसिध्द संगीतकारांच्या गाण्यांवर आधारीत कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आता नव्या "ज्युक बॉक्स" या संकल्पनेतून भप्पी लहिरी स्पेशल या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

८० व्या दशकात "किंग ऑफ डिस्को" म्हणून ऒळखल्या जाणा-या व आता नुकताच गाजलेल्या डर्टी पिक्चर मधून पुनरागमन केलेल्या भप्पी लाहिरी उर्फ भप्पीदा यांच्या संगीतबध्द केलेल्या गाण्यांवर आधारीत हा कार्यक्रम असून त्यांच्याबरोबर अनेक वर्षे काम केलेले गिटारवादक व संगीत संयोजक सुनील कौशिक, संगीत संयोजन राजेश मनोहर सिंग, गीतकार सुधाकर शर्मा, गायिका रक्तिमा मुखर्जी या कालाकारांबरोबरच स्थानिक कलाकारही सहभागी होणार आहेत.