Sign In New user? Start here.

 
 
zagmag

'तुझ्या मुळे' अल्बमचे अनावरण

'तुझ्या मुळे' या संगीत अल्बमचे अनावरण नुकतेच करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ. भा. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, अभिनेत्री प्रियांका यादव, दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे तसेच अल्बमचे संगीतकार चंद्रशेखर जनवडे आणि इतर कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. ''या अल्बममधील गाणी अतिशय गोड असून ती ह्रदयाला भिडणारी आहेत'' या शब्दात अभिनेत्री प्रियांका यादव यांनी या अल्बमला शुभेच्छा दिल्या.

तुझ्या मुळे' या अल्बममध्ये 'तुझ्यामुळे नयनी माझ्या….' आणि 'अधीर कशी तळमळ ही…' ही दोन प्रेमगीते असून ती मंगेश बोरगावकर, रोहित राऊत आणि कीर्ती किल्लेदार यांनी गायली आहेत. नगर जिल्ह्यातील नयनरम्य लोकेशन्सच्या पार्श्वभूमीवर ही गाणी प्रशांत वनशिव, कामाक्षी कुलकर्णी आणि सुचित्रा गोसावी यांच्यावर चित्रित करण्यात आली आहेत. कैमेरामन संतोष काडापुरे यांनी छायांकन केले असून नृत्यदिग्दर्शन संग्राम भालेकर आणि ऐश्वर्या काळे यांनी केले आहे.

संगीतकार चंद्रशेखर जनवडे यांनीच ही दोन्ही गीते लिहिली आहेत. या गीतातून आणि संगीतातून प्रेमाच्या तरल भावना अतिशय हळुवारपणे सादर केल्या गेल्या आहेत असे त्यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. तर हा अल्बम करताना आपणास एक वेगळाच आनंददायी अनुभव मिळाला असे या अल्बममधील कलाकार प्रशांत वनशिव, कामाक्षी कुलकर्णी आणि सुचित्रा गोसावी यांनी सांगितले.आयुष प्रौडक्शन हाऊस या बैनरखाली तयार करण्यात आलेल्या या अल्बमचे निर्माते प्रशांत भारत वनशिव हे असून दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे यांनी केले आहे.