Sign In New user? Start here.

पुण्यात आज रंगणार उमेद पुरस्कार समारोह

 
 
zagmag

पुण्यात आज रंगणार उमेद पुरस्कार समारोह

प्रसिध्द निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्या निर्मिती संस्थेतर्फे दिल्या जाण-या उमेद पुरस्कारांसाठी यंदा ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता सौरभ शुक्ला, गायिका रेखा भारव्दाज, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, खलनायकी भूमिकांव्दारे सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा कलाकार झाकिर हुसेन, दिल दोस्ती दुनियादारी या टिव्ही मालिकेमुळे घरोघरी लोकप्रिय असलेला पुण्यातील अभिनेता अमेय वाघ, अभिनेत्री हेमांगी कवी, आणि किंग ऑफ स्लो मोशन म्हणून मुलांमध्ये, तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला डान्सर कोरियोग्राफर अभिनेता राघव जुयाल यांना उमेद पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. २२ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे हा सोहळा रंगणार आहे.

पुरस्कारांचे हे १९ वे वर्ष आहे. चित्रपट, टीव्ही आणि नाटक या क्षेत्रांत योगदान देणा-या कलाकारांच्या गौरव करण्यासाठी आणि नवोदित कलाकारांच्या भावी वाटचालीला प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. दुबई येथील प्रसिध्द उद्योजक धनंजय दातार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यात सादर होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रसिध्द नर्तक आशिष पाटील हे ’नृत्यांगण’ कला अ‍ॅकॅडमी कलाकारांबरोबर नृत्य सादर करणार आहेत. प्रसिध्द हास्यसम्राट दीपक देशपांडेही रसिकांशी गप्पाही मारणार आहेत. चित्रपट, टीव्ही क्षेत्रात पडद्यामागे राहून कार्य करणारे तरूण कलाकार नृत्यांगना अक्षता तिखे, जुन्नरकर, नृत्यदिग्दर्शिका सॅड्रिक डिसूझा, हितेश पाटील यांचाही या सोहळ्यात विशेष सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे निवेद्न स्मिता गवाणकर करणार आहेत. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.