Sign In New user? Start here.

अभिनेते देवेन वर्मा यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन

 
 
zagmag

अभिनेते देवेन वर्मा यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन

इश्क, चोर के घर चोर, अंगुर, खट्टा-मीठा, या सारख्या असंख्य चित्रपटाव्दारे प्रेक्षकांना हसवणारे प्रसिद्ध अभिनेते देवेन वर्मा यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. पुण्यात काल रात्री दोन वाजता येरवड्यातील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवेन वर्मा यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12 वाजता येरवडामधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

चमत्कार, जुदाई, इश्क, चोर के घर चोर, अंगुर, खट्टा-मीठा, कोरा कागज, चोरी मेरा काम यातील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी 150हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला. 'अंगूर', 'खट्टामिठा' या चित्रपटांमधील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. देवेन यांना 'चोरी मेरा काम', 'चोर के घर चोर' आणि 'अंगूर' या चित्रपटांतील भूमिकांसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले होते.

२३ ऑक्टोबर १९३७ रोजी जन्म झालेल्या देवेन यांचे बालपण पुण्यात गेले. पुण्यातील नवरोजी वाडीया कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्समधून राज्यशास्त्र आणि मानसशास्त्रामध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांची मुलगी रुपा गांगुली यांच्याशी देवेन त्यांचा विवाह झाला. 'धर्मपुत्र' चित्रपटातून १९६१ साली त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. हिंदी बरोबरच मराठी आणि भोजपुरी सिनेमांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. बासु चॅटर्जी, ऋषिकेश मुखर्जी आणि गुलजार यांसारख्या दिग्गजांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतील देवेन यांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या. त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले होते.