Sign In New user? Start here.

वृंदावनात रंगला महिला दिन

 
 
zagmag

वृंदावनात रंगला महिला दिन

भारतीय समाजातील अनेक बंधने, पूर्वग्रहदुषित कल्पना, रूढी झुगारून कालप्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करत काही स्त्रियांनी कायम इतिहास घडविला आहे. या स्त्रिया आज सर्वच महिलांसाठी आदर्श ठरल्या असून, त्यांच्या कौतुकपर जागतिक महिला दिन प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधत ठाण्यातील वृंदावन सोसायटीत नुकताच महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला. 'वृंदावन' या सिनेमाच्या कलाकारांसोबत महिलांनी या दिवसाचा आनंद लूटला. या सिनेमाचे मुख्य कलाकार राकेश बापट, वैदेही परसूरामी यांसोबतच सिनेमाचे सहनिर्माते अमित आणि अनघा कारखानीस यांनी देखील महिला दिन साजरा केला.

नेहमीच्या चाकोरीबद्ध आयुष्यातून वेळ काढत महिलांनी 'वृंदावन' या सिनेमाच्या कलाकारांसोबत खेळदेखील खेळले. मज्जा-मस्तीमध्ये रंगलेल्या या कार्यक्रमात राकेश बापट आणि वैदेही परसूरामी या दोघांनी 'वृंदावन' सिनेमातील 'डॅशिंग गोविंदा' या सुपरहिट गाण्यांवर उपस्थित महिलांसोबत काही स्टेप्स देखील केल्या.

एंटरटेंनमेंटचं कम्प्लीट पॅकेज असणा-या या सिनेमाचं दिग्दर्शन साउथचे प्रसिद्ध दिग्दर्शक टीएलव्ही प्रसाद यांनी केले आहे. राजप्रेमी, संदीप शर्मा, सुनील खांद्पुरकर या तिघांनी मिळून ''रिअलस्टिक फिल्म कंपनी' च्या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती केली असून अमित कारखानीस आणि अनघा कारखानीस हे सहनिर्माते आहेत. जीसिम्सचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बर्हान हे सिनेमाचे प्रमोटर्स आहेत. मल्टीस्टारर असलेल्या या सिनेमात रोमान्स आणि अॅक्शनचा तडकादेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीतच एंटरटेनमेंटचा मालमसाला असलेला हा चित्रपट येत्या ८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.