Sign In New user? Start here.

 
 
zagmag

नंदेश उमप यांच ‘वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डस’ ,५० मीटरचा घागरा परिधान करून अडीच तास लोकनाट्य सादर

शाहीर विठ्ठल उमप आणि त्यांच्या पत्नी वत्सलाताई उमप यांच्या जन्मदिना निमीत्त 50 व्या प्रयोगाचे दादर ‘शिवाजी मंदीर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर'तर्फे 15 जुलै रोजी 'जांभूळ आख्यान'चा 50 वा प्रयोग सादर करण्यात आला.

यावेळी नंदेश उमप यांनी 50 व्या प्रयोगाच्या निमित्ताने 50 मीटरचा घागरा आणि इतर दागिने परिधान करुन तब्बल अडीच तास हे लोकनाट्य सादर केले. त्यानिमित्ताने नंदेश उमप यांची 'वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डस'मध्ये नोंद करण्यात आली आहे. 'लाँगेस्ट म्युझिकल ड्रामा विथ हेवियेस्ट एक्सेसरीज' या शीर्षकाखाली नंदेश उमप यांच्या या उपक्रमाची दखल घेण्यात आली.वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड'चे संस्थापक पवन सोळंकी यांच्या हस्ते नंदेश उमप यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.