Sign In New user? Start here.

lalit mahadeshwarआज अखंड भारत आपल्या नव्या नेतृत्वाकडे नव्या उम्मेदिने पाहतो आहे. अनेक वर्षे पाहिलेली अपुरी स्वप्ने,अपुर्या इच्छा आणि आकांक्षा. ज़न्त्रि एवढी मोठी आहेकी नव्या सुरवातीला प्रश्न पडावा की श्री गणेशा कोठून करावा. औद्योगिक विकासाची आठवण करून देण्यासाठी, मोदीं जवळ अंबानी आणि टाटा आहेत. पण इतर सर्व विधायक योजना आणि कार्य हातात घेण्यापूर्वी आमचे एक छोटेसे पण फार महत्वाचे काम आहे. .

नवीन सुरवात शेवटापासून

 
lalit mahadeshwar
श्री.ललित महाडेश्वर यांच्या नजरेतून

आज अखंड भारत आपल्या नव्या नेतृत्वाकडे नव्या उम्मेदिने पाहतो आहे. अनेक वर्षे पाहिलेली अपुरी स्वप्ने,अपुर्या इच्छा आणि आकांक्षा. ज़न्त्रि एवढी मोठी आहेकी नव्या सुरवातीला प्रश्न पडावा की श्री गणेशा कोठून करावा. औद्योगिक विकासाची आठवण करून देण्यासाठी, मोदीं जवळ अंबानी आणि टाटा आहेत. पण इतर सर्व विधायक योजना आणि कार्य हातात घेण्यापूर्वी आमचे एक छोटेसे पण फार महत्वाचे काम आहे. .

जेते इतिहास लिहितात हे सत्य आहे. त्यामुळे शिकविला जाणारा इतिहास नेहमी बदलत राहतो पण निदान शोध घेणार्यांना शोधून खरा इतिहास सापडतो. 'रणछोडदास' म्हणवून घेणाऱ्या कृष्णाच्या कर्मभूमीतून आलेल्या मोदींना आठवण करून द्यावी असे वाटते की वाल्मिकी आणि व्यास ह्यांना राम आणि कृष्ण ह्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग लापावावेसे वाटले नाहीत पण परकीयांनी भारताचा इतिहास पुसून आमची मनोवृत्ती बदलली. आपल्या संस्कृतीची पाळेमुळे उखडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. आता कुतुब मिनाराच्या घडणीत आपण भग्न मंदिरांचे अवशेष शोधतो. आणि बायबलारुजेल इतकाच म्हणजे ३५०० वर्षापर्यंतच भारतीय इतिहास मागे जाऊ शकतो. ह्या परकीय मनोवृत्तीत तयार झालेले काही भारतीय असाच नवा इतिहास रचू इच्छितात.

आजही महाराष्ट्राबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशीच मने साशंकच आहेत. तीच गात आजही केली जात आहे आणि तीही स्वकियांकडून. हे सर्व आत्ताच थांबवणे आणि सुधारणे फार महत्वाचे आहे. आज आपण सर्व स्वात्यंत्रवीरांना आदरांजली वाहातो. त्यात रक्तरंजित आणि नेतृत्वहीन अशा १८५७ सालच्या बेलगाम उठावाचे कौतुक होते पण एका अलौकिक बुद्धिमत्तेच्या अनन्यसाधारण राष्ट्रीय कवी आणि थोर विचारकाला विसरवून टाकण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. स्वात्र्यांतवीर सावरकर आणि त्यांची मते कोणाला पटोत किंवा न पटोत. पण देशप्रेमासाठी ५० वर्षे सक्त मजुरीची आणि काळयापाण्याची शिक्षा भोगत असताना निर्माण केलेल्या ‘कमला’ काव्याच्या खुणा आज स्वतंत्र भारतात पुसल्या जातात. मनी शंकर अय्यर ह्या मुर्खाने निव्वळ स्वर्थापोटी अंदामानांत काव्य लिहिलेल्या तुरुंगाच्या भिंती रंगवल्या आणि तेथील स्मारक काढण्याची हिम्मत दाखवली. ह्याची दुरुस्ती होणे भारताच्या भविष्यासाठी फार गरजेचे आहे. आपल्या पुरुषत्वाचे सबळ पुरावे नष्ट करणाऱ्या छंढांना त्यांची पायरी दाखविण्याची गरज आहे. आज सावरकरांना स्वतंत्र भारतात झालेल्या नजर्कैदेची सरकारी माफी भारत सरकारने द्यावी आणि सन्मानाने त्यांचे स्मारक हे राष्ट्रीय स्मारक घोषित करावे. त्यांना फक्त हिंदुत्वाच्या भगव्या काविळीने न पाहता एक महान राष्ट्रनेता हे उचित स्थान दिले जावे. भारताच्या भावी पिढ्या त्यांच्या त्यागाला विसरणार नहित ह्याची खबरदारी आपण घेतलीच पहिजे. तर मोदिसाहेब, नवीन भारताच्या भविष्याची उभारणी करताना काही छोटेउल्लेख सुधारावेत हीच माफक इच्छा.

हे सर्व मानानेमागताना सहिष्णूता आणि इतर कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत. सर्वधर्म समानता जपणाऱ्या भारतात स्वतंत्रतेला 'देवी भगवती' म्हणून पुजानार्यांची हिंदू मनोवृत्ती म्हणून कुचंबणा करण्याचा मूर्खपणा करणे म्हणजे इतर धर्मांचा आदर नव्हे. सर्व धर्मियांचे रक्षण कराच पण एखादी मैत्रीयात्रा काढण्याच्या अगोदर ह्या सरकारी चुका दुरुस्त करा.

 
आणखी ब्लॉग