Sign In New user? Start here.
नमस्कार मी मोनाली शेनोलीकर (माहेरची मोनाली भोसले). मला झगमगने ब्लॉग लिहायला सांगितल.. आणि ब्लॉग म्हणजे काहीतरी “इंटरेस्टिंग स्टोरी” सारख लिहा असंही पुढे सांगितलं खरंच आहे म्हणा ... नाहीतर सोशल नेटवर्किंग साईट एवढ्या पॉप्युलर झाल्या असत्या का?

मोनाली शेनोलीकर-भाग २

 

मला झगमगने ब्लॉग लिहायला सांगितल.. आणि ब्लॉग म्हणजे काहीतरी “इंटरेस्टिंग स्टोरी” सारख लिहा असंही पुढे सांगितलं खरंच आहे म्हणा ... नाहीतर सोशल नेटवर्किंग साईट एवढ्या पॉप्युलर झाल्या असत्या का? आता खर सांगायच तर माझ्या आयुष्यात तसे इंटरेस्टींग व्टिस्ट अ‍ॅन्ड टर्न नाहीतच. आमचं मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंब.. आई, बाबा मोठा भाऊ आणि मी. लहानपण ब-यापैकी मध्यमवर्गीय सुखवस्तू... म्हणजे घरी काही अडचणी आल्या असल्या तरी आई-बांबानी त्या आमच्या पर्यंत कधीच पोहचू दिल्या नाहीत. आई-बाबांची शासकीय नोकरी, भाऊ क्रिकेट कोच.. लहानपणापासून सगळ्यांनी खूप लाड केले. मग ते आमचे न्य़ू इंग्लिश स्कूल, बांद्रा चे शिक्षक, नातेवाईक किंवा शेजारी असोत. एकूणच काय पुलंच गुळगुळीत वेष्टनातलं ते चौकोनी कुटुंब थोड्या फार प्रमाणात आमचंच असावं असं त्याकाळी वाटायचं. मला जास्त करून स्पर्धांना मामा घेऊन जात असे. आई बाबांचा फुल सपोर्ट होताच पण अभ्यास आधी या अटीवर...

निर्मल नगर, बिल्डींग नं १५.. आमची म्हाडा ची छोटीशी वसाहत. वसाहत तशी छोटी पण त्यात आमच्यासारखे हौशी कलाकार मात्र बरेच होते. त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्र आणि नविन वर्षाच सेलिब्रेशन होत असे. उत्सव जोरदार व्हायचे. मग त्यात गाणी, नाटक, नृत्य करणं आणि बसवणं हा माझा दरवर्षीच उद्योग झाला.

पण नृत्य हे सुध्दा एक शास्त्र आहे याची प्रचिती आली ते गोपीजींच्या घरी... कथ्थक शिकवणीच्या वेळेस मी सहावीत असताना. कथ्थक शिकायला नटेश्वर भवनला जाऊ लागले तिथे आमच्या लहान मुलींच्या बॅचला रमादेवी आणि राजू भैया शिकवायचे पण आमचा क्लॉस चालू होण्यापूर्वी गोपीजी, वैभवदादा आणि राजूभैया तिघेही फूटवर्क ची प्रॅक्टीस करत आणि आम्ही तिथे बघत असू: तेव्हा वाटाय़चं गोपीजीची या वयात या स्पिडला पाय थिरकतात तर आपल्याला केवढं सोपं! लहाणपणीच निरगसपण ते!

उभं राहून तीन ताल करायला सुध्दा जमत नव्हत पण विचारांच्या भरा-यां मात्र उंच आकाशात! आता कळतंय की त्या वेळी गोपीजींचा स्पिड म्हणजे दैवी देणगी होती जी तुमच्या आमच्यांकडे नसते. असो, तर एकदा आम्ही असेच बसलो असताना माझ्या मैत्रीणिने काहीतरी जोक केला असावा म्हणून आम्ही दोघीही जोरात हसलो. गोपीजींना ते आवडल नाही ते काही आंम्हाला ऒरडले नाहीत पण शांतपणे दोघीना उठायला सांगितल आणि म्हणाले ... एक दो तोडे करके दिखाऒ बच्चॊ.

आम्ही काय घाबरतोयअ, बिनधास्त पहिल्या दहात्ले दोन तोडे चालू केले आमच झाल्यावर आम्हाला काहीचन बोलता राजूभैय्या ला म्हणाले ऎसे सिखाऒगे तो मेरी नाक काटोगे आणि आम्हाला म्हणाले “ बच्चो यह कथक है इसे सिर्फ नृत्य ना कहो, यह जिंदगी है.. त्यातला आशय कळण्यांसारख ते वय नव्हत. पण आता कळतंय की त्यात केवढा मॊठा अर्थ होता. त्या माणसासाठी नृत्य हे आयुष्य, नृत्य हा श्वास!... पण ते गोपीजी होते.