Sign In New user? Start here.

ॐकार मंगेश दत्त

"World

आणखी ब्लॉग
 
 
omkar
omkar

ॐकार मंगेश दत्त

झगमग आपल्या वाचकांना नेहमीच काहीना काही नवीन देण्याचा प्रयत्न करत असते. मग ते चित्रपटाच्या बातम्य़ा असोत किंवा मराठी मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडी. याच बरोबर कौशल इनामदार, चंद्रशेखर गोखले, सुधीर गाडगीळ सारख्या अनेक व्यक्ती झगमग व्दारे तुमच्या भेटीस आल्या आहेत. या ही वेळेस झगमग ने खास तरूण लेखक, दिग्दर्शक व्यक्ती तुमच्या भेटीस आणली आहे जी तिच्या चित्रपट आणि लेखनशैलीतून तुमच्या मनात आधीच पोहचली आहे फक्त तुम्ही तिला नावाने नसाल ओळखत पण गंगाधर टिपरे च्यां ह्ळुवार पावलांनी ‘अगं बाई अरेच्या’ करत तुमच्या मनाच्या ‘वरच्या क्लास पर्यंत जाऊन पोहचली आहे. तिच नाव आहे ओंकार मंगेश दत्त ओंकार बद्दल आम्ही काय सांगणार वाचा ओंकार बद्दल ची माहिती त्याच्यांच शब्दात

नमस्कार,

मी ओंकार मंगेश दत्त..

२००३ साली ‘अगं बाई.. अरेच्या’ या सिनेमाच्या सेटवर ‘असिस्टंट डिरेक्टर म्हणून पाउल ठेवलं आणि त्याचं दिवसापासून मराठी सिनेमा क्षेत्रातला पडद्यामागचा माझा प्रवास सुरू झाला... तेव्हा खंरच वाटलं नव्हतं कि हा प्रवास मला इथवर घेवून येईल...

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ‘जत्रा, यंदा कर्तव्य आहे’, माझा नवरा तुझी बायको; मुक्काम पोस्ट लंडन, बकुळा नामदेव घोटाळे आणि अगदी हिंदीतील ‘तो बात पक्की’ असे अनेक सिनेमे केल्यानंतर काहीतरी वेगळं करावं असं प्रकर्षाने वाटू लागलं आणि तेव्हाच ‘मी मराठी या वाहिनीसाठी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून वरचा क्लास’ हि मालिका करण्याचा योग आला...

‘वरचा क्लास’ हि माझी लेखक, दिग्दर्शक म्हणून पहिलीच मालिका.. पण त्यामानाने प्रेक्षकांकडून तिला मिळालेला प्रतिसाद फारच छान होता... मालिका ऑफ एअर गेल्यावरही वाहिनीने ती ब-याचवेळा पुन:प्रसारित केली हेच मालिकेंचं यश म्हणायचं

त्यानंतर मी लेखनाच्या वाटेवर पुढे जायाचं ठरवलं आणि तोही प्रवास तितकाच समाधानकारक होता... ‘इरादा पक्का’, श्रीमंत दामोदपंत’, खोखो’, आगामी ‘काकण’, ‘कल्ला’ अशा अनेक सिनेमांसाठी पटकथा पूरक संवाद, कथा विस्तार अशा अनेक जबाबदा-या मी पार पाडल्याच पण त्यांच बरोबर-

‘गलगले निघाले’, ऑन ड्युटी २४ तास’, ‘इरादा पक्का’, श्रीमंत दामोदरपंत’, अगामी ‘काकण’, ‘कल्ला’ या सिनेमांसाठी गीतलेखक म्हणूनही चांगलीच कामगिरी केली. दुसरीकडे मालीकांसाठीही लिखाण सुरू होतंच...मधु इथे अन चंद्र तिथे’, ‘अजूनही चांदरात आहे’ या झी मराठी वरच्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.. या दोन्ही मालिकांच्या शिर्षक गीतासाठी ‘ झी मराठी अवॉर्डस’ साठी नामांकनही मिळाल..

दरम्यान एपिसोड दिग्दर्शनाचे अनेक प्रसंगही आले आणि वेळोवेळी मी थोड्या काळासाठी का होईना दिग्दर्शनाची धुरा हातात घेतली. याच वर्षी १४ फेब्रुवारीला आलेला माझा पहिला रोमॅटिक गाण्याचा व्हिडीओ हा त्यातलाच एक दिग्दर्शनाचा यशस्वी प्रयत्न.. नेहा राजपाल आणि मंगेशकर बोरगावकर याने गायलेले ‘मन हे बावरे’ या गाण्याचा मी डिरेक्ट केलेला व्हिडीऒ थोड्याच काळात तरूणाईच्या गळ्याचा ताईत झाला.. फेसबुक, यु-ट्यूब द्वारे लोंकाच्या अनेक प्रतिक्रिया आमच्या पर्यंत पोहचल्या.. पण त्याचबरोबर व्हिडीओ पाहून केदार शिंदे, भारत जाधव, क्रांती रेडकर, रवी जाधव, कौशल इनामदार, गुरू ठाकूर अशा चित्रपट क्षेत्रातील जाणकारांनी कौतुकाने आमची पाठही थोपटली. तुमच्या प्रतिक्रियेतून तुम्ही मला नेहमीच प्रेम दिल तुमच्या आणखीन जवळ येण्यासाठी मी येत आहे झगमग डॉट्नेट वर ते ही ब्लॉगच्या स्वरूपात माझ्या प्रेम कथा तुम्हाला वाचायला मिळतील भेटूच नविन.... वर्षाच्या मुहूर्तावर म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी

------------------