Sign In New user? Start here.

शांतता, नाटक चालू आहे!

 

शांतता, नाटक चालू आहे!

 

सुभग ओक

नाटक चालू असता, 'सेल-फोन' वाजला तर? कोणाचे मुल आरडा-ओरडा करू किंवा रडू लागले तर? किंवा प्रेक्षक गप्पा मारू लागले तर, कलाकारांनी काय करावे? विक्रम गोखले ह्यांनी 'चालू नाटक' थांबवल्याचे आपण ऐकले आहे. कोण बरोबर आणि कोण चूक?

पैसे भरून प्रेक्षक येतात, तेव्हा "इट्स ए पेड सर्विस" : नाटकाकडे त्यांचा असा दृष्टीकोन काही चुकीचा नाही. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना विरंगुळा हवा आहे, ए.सी ची हवा, मनाची करमणूक आणि थोडा टाईम-पास हीच त्यांची अपेक्षा. टी-व्ही आणि सेरीअल्स मुळे, काही आवडले नाही कि आपला शेरा मारून चान्नेल्स बदलणारे हे प्रेक्षक. पायरेटेड चित्रपट बघून आपली प्रतिक्रिया देणार. बरं, हल्ली तिकिटं एवढी महाग झाली आहेत कि लोकांना त्याचा पुरेपूर मोबदला हवा असतो...तेव्हा "सुमार" दर्जा, प्रेक्षक पटकन ठरवतात आणि त्याची पावती हि ताबडतोब देतात. त्यांतून लोकांना इतकी कामं असतात, कॉन्नेक्टीविटी हवी असते, फेस-बुक/ट्विटर वर स्टेटस पाहिजे असते ... नाटक नंतर..... आधी इतर गोष्टी. पण प्रेक्षक मायबाप आहे, तो नसेल तर नाटक कसं होणार?

सांगा ना, हे असच चालू राहणार का? कैक वेळी, नाटक चांगलं असतं, कलाकार उत्तम असतात आणि प्रयोगही रंगलेला असतो. थोडक्या कलावंत आपली जबाबदारी परिपक्वपणे आणि यशस्वीरित्या पार पाडतात.. पण तरीही प्रेक्षक आपली जबाबदारी पार पाडत नाहीत. रंगकर्मी हे "प्रोफेशनल" असतात.... पण जसं "हॉस्पिटल" मध्ये धुम्रपान हानिकारक आहे, देवळात चप्पल घालून जाने असात्विक आहे, शाळेत "उलटून" बोलणे बेशिस्त-पणाचे लक्षण आहे, आई-बाबां समोर शिव्या देणे जसे उद्दाम आहे.... तसेच किंबहुना त्याहुम जास्त चुकीचे आहे कलावंताच्या समोर त्या कलेचा अनादर करणे. तो 'जो नाही', जे लेखकाने लिहिले आहे, जे दिग्दर्शकाने बसवले आहे, जे त्यला स्वतःला उमजले आहे, ते तो कलाकार प्रेक्षकांसमोर सादर करतोय. तुम्हाला त्यात गुंतवू पाहतोय, तुम्हाला ती व्यक्तिरेखा पटवू पाहतोय.. हे सगळं सोप्प नाही.

'आधे अधुरे' मध्ये मी ५ भूमिका केल्या. नाटक सुरु होण्या आधी लोकांना मी "सुभग ओक" आहे हे माहित होतो.... तरीही नाटकाच्या २ तासात ५ वेगवेगळी माणसं मी प्रेक्षकांना दाखवायचा "प्रामाणिक" प्रयत्न केला. दुसऱ्या प्रयोगाला काही तथा-कथित लोकल हिंदी नाटक/नृत्यात सहभागी होणारी ३/४ लोकं आली आणि दुसऱ्या अंकात प्रत्येक अनुचित वाक्याला "गप्पा, कॉम्मेंत्स, हशा" देऊ लागली. प्रयोग संपल्या नंतर एक प्रेक्षक मला म्हणाला "मी त्यांना बाहेर जायला सांगणार होतो, हीच लोकं पर्फोर्म करतात आणि ह्यांना प्रेक्षक काय असतो माहित नसावे?" ... प्रेक्षकाला हि एक अस्तित्व असतं, एक महत्व असतं हे ह्याना आणि असल्या प्रेक्षकांना मला कळ-कळीने सांगायचे आहे. "ताली एक हात से नाही बजती"... तसच नाटक नुसत्या कलाकारांमुळे होत नाही. प्रेक्षकाने हि त्यांची जबाबदारीची भूमिका समर्थपणे केली पाहिजे. नाट्यकला माझ्यासठी पूजनीय आहे... मी ती तशीच अनुभवतो, ती तशीच निष्ठेने करतो.... त्यात आजवर फायदा-तोटा पहिला नाही आणि म्हणूनच अजुनहि माझी कला पवित्र आहे (आणि मला त्याचा अभिमान आहे). हीच मानसिकता, वैचारिकता आणि बुद्धिमत्ता मला प्रेक्षकांमध्ये पाहायची आहे .... जे "कलेकडे" वेळ घालवण्याचे साधन म्हणून बघतात, गम्मत म्हणून बघतात त्यांच्या कडून मी काय अपेक्षा करणार... ते माझ्या प्रयोगाला नाही आले तरी मला चालेल....

एक मात्र खरं, कलाकृती हि सर्वात श्रेष्ठ असते.... ती खूप काही शिकवते, घडवते, समृद्ध करते. ही कला सादर करताना, माझ्या सवंगड्यांना एकच आग्रहाची विनंती ....नुसतं नाटक लक्ष्यात ठेवू नका....त्यामागची तळ-मळ, निष्ठा, श्रद्धा, संस्कृती, चांगुलपणा आणि शिकवण लक्ष्यात घ्या. सुधा करमरकर, पुरषोत्तम दारव्हेकर, चेतन दातार, वामन केंद्रे, विजय केंकरे, विनोद हडप ह्या सारख्या दिग्गजांकडून मी हेच शिकलो. कला श्रेष्ठ अन प्रयत्न प्रामाणिक असावा आणि हो परिणामांची चिंता करू नये कारण तो अनपेक्षित असतो ...हीच तर ‘खऱ्या’ कलावंताची ओळख असते. कलाकार स्टेज वर कसा आहे ह्यापेक्षा तो ऑफ-स्टेज कसा आहे, हे महत्वाचे, माझ्यासठी....

सुभग

आणखी ब्लॉग