Sign In New user? Start here.

तृप्ती खामकर

trupti khamkarमला नेहमीच अभिनेत्री व्हायचं होतं. मी बरेचदा विचार करत असते, की असं काय होतं लहानपणी जे मला व्हावस वाटयचं आणि मला काहीच आठवत नाही.

 

अभिनेत्री: तृप्ती खामकर

 

मला नेहमीच अभिनेत्री व्हायचं होतं. मी बरेचदा विचार करत असते, की असं काय होतं लहानपणी जे मला व्हावस वाटयचं आणि मला काहीच आठवत नाही. लहानपणीच्यां फोटो अल्बम मध्ये कायम camera friendly expressions होते. एकच स्वप्न आपण actor व्हायचं...

तर अगदी लहान असल्यापासून पाहिलेलं स्वप्न खर करण्याची सुरवात झाली ती १९९८ मध्ये शाळेच्या शेवटच्या वर्षी. अचानक कुठून तरी "दैवी" confidence आला आणि आमच्या सरांना जाऊन सांगितल की मी मराठी मोनो-अ‍ॅक्टींग मध्ये भाग घेणार आहे. मित्रांनी खूप टिंगल केली, पण मला त्या स्पर्धेमध्ये दुसरं पारितोषीक मिळालं आणि तिथूनच खरी सुरूवात झाली.

मग गोखले कॉलेज, बोरीवली तर्फे दोन वर्ष मराठी, हिंदी, उर्दु आणि गुजराती एकांकीका स्पर्धेत कामं केली. खूप छान प्रवास सुरू होता, पण प्रत्येक गोष्टीत conflict असतचं की....खूपच cliche, आई-वडिलांचा विरोध ! खूप झाली नाटकं Bachelors of management चं करायचं आणि तेही भवन्स महाविद्यालय, अंधेरी मधून. एक तर या कॉलेज मध्ये खूप अभ्यास असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कॉलेज मधून कोणी नाटक करत नाही.

पण म्हणतातना देव तारी, त्याला कोण मारी! ज्या वर्षी मी प्रवेश घेतला, त्या वर्षी एका दिग्दर्शकाने तिथे नाटकाची चळवळ सुरू केली.... गोष्ट आता जरा fast track वर आली.... आमचा दिग्दर्शक, निर्मल पांडे अंधायुग नावाचं नाटक करत होता त्याने मला बोलावलं. तेव्हांच एक अदाकार नावाची स्पर्धा "ईटिव्ही उर्दु" वर होत असे. त्याच्या मेगा फायनल मध्ये मी जिंकले, म्हणून या नाटकाचं कास्टींग पुन्हा झालं आणि मला "अंधायुग" मध्ये गांधारीची भूमिका साकारायला मिळाली एका बाजूला B.M.S आणि दुसरी कडे नाटक. माझ्या कॉलेज च्या मित्र मैत्रीणींनी मला खूप साथदिली. अगदी नाटकाच्या तालमी नंतर मला आपल्या घरी नेऊन जेवू-खाऊ घालूण माझ्या कडून परीक्षेची तयारी करून घेण्या पासून माझ्या प्रोजेक्ट सबमिशन पर्य़ंत सगळचं.

झालं graduation degree मिळाली. आता काय पुन्हा ते conflict, आता MBA.. पण मी अ‍ॅक्टर व्हायचं कदाचीत विधीलिखीत होतं. तेव्हाचं मुंबई विद्यापीठात Masters in Theater Arts Facility सुरू झाली. Academy of Theater arts was the next destination.