Sign In New user? Start here.

vidyanidhi vanarseश्री. विद्यानिधी वनारसे (प्रसाद) गेली सुमारे वीस वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत. पदवी पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाल्यानंतर त्यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली (एन.एस.डी.) येथून पूर्ण केले.

 
vidyanidhi vanarse
vidyanidhi vanarse

ओळख... विद्यानिधी वनारसे (प्रसाद)

श्री. विद्यानिधी वनारसे (प्रसाद) गेली सुमारे वीस वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत. पदवी पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाल्यानंतर त्यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली (एन.एस.डी.) येथून पूर्ण केले. त्यांनी आजवर मराठी, हिंदी, कोंकणी, कानडी आणि इंग्लिश अशा विविध भाषांमधे काम केले आहे. विविध नाटकांचे मराठीत भाषांतर आणि अनुवाद केलेला आहे. कलेशी संबंधित दिग्दर्शन, व्यवस्थापन आणि उपयोजन या परस्परसंबंधित विषयांवर त्यांनी प्रभुत्व मिळविलेले आहे.

गेल्या दशकभरापासून ते आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नाट्यसंस्था बरोबर देखिल काम करीत आहेत. वनारसे यांची नाटके देशाच्या अनेक भागात राष्ट्रीय आणि स्थानिक महोत्सवात सादर झालेली आहेत. काँटॅक्टिंग द वर्ल्ड, मॅन्चेस्टर २००६ आणि २०१०, लंडन इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ थिएटर २००८, कोलंबो इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल २०१२, २०१३ आणि २०१४ तसेच युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इंस्टिटयूटने रोमानिया येथे आयोजित केलेल्या वर्ल्ड फेस्टिवल ऑफ थिएटर स्कूल्स अशा विविध ठिकाणी त्यांनी प्रयोग केले आहेत.

नाट्यशिक्षण या विषयात ते गेले २० वर्षे काम करत आहेत. देशातील आणि परदेशातील अनेक नाट्यशिक्षण संस्था आणि विद्यापीठे इथे त्यांनी पाहुणा दिग्दर्शक आणि शिक्षक म्हणून काम केले आहे.

त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. नाट्यदर्पण, मुंबई चा प्रायोगिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक हा पुरस्कार तसेच कलागौरव प्रतिष्ठान, पुणे यांचा सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक पुरस्कार हे त्यातील काही.

औद्योगिक जगताबरोबर सल्लागार म्हणूनही ते काम करतात. व्यवसायातील संघ बांधणी आणि उभारणी यासाठी त्यांनी अनेक कार्यशाळा आखलेल्या आणि राबवलेल्या आहेत. यासाठी नाटक हे माध्यम त्यांनी प्रभावीपणे वापरलेले आहे.

आय.ए.पी.ए.आर. म्हणजेच इंटरनॅशनल असोसिअशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अँड रिसर्च या संस्थेचे ते संस्थापक संचालक आहेत. मिडास या उद्योजकतेचे प्रशिक्षण देणा-या शैक्षणिक संस्थेचे ते सहकारी सल्लागार आहेत.

तूर्तास ते युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इंस्टिटयूटचे भारतीय केंद्राच्या उभारणीचे काम करत आहेत.