Sign In New user? Start here.

आणि सादेसुधे जनाभाऊ जल्लाद ठरले...

chandrashekhar gokhale तुम्हाला सिंड्रेलाची गोष्ट सांगू ?... सिंड्रेलाची गोष्ट सांगायला आटपाट नगराची गरज नाही. आमच्या समोरच्या गल्लीतच गौरी फडणीस नावाची सिंड्रेला रहायची....आमच्या फडणीसबाईंची सावत्र मुलगी..दिसायला सिंड्रेला पेक्षाही सूंदर आणि वागायला सीतेसारखी साध्वी..वयानं म्हणाल तर असेल विशी ओलांडलेली. बाईनी तिचा तसा छळवाद केला नाही. पण कधी प्रेमही केलं नाही. ना माया केली. एकटेपणासुद्धा माणसाला ग्रासतो, गौरीचं तसं झालं. आई म्हणायची त्यात बाईंचीही चूक नाही. बाईंचं फसवून लग्न या बिजवराशी लावलं.

आणि सादेसुधे जनाभाऊ जल्लाद ठरले...

 

चंद्रशेखर गोखले

जनुभाऊ आमचे शिंदेवाडितले शेजारी. साधे सुधे पापभिरू ग्रहस्थ दोन मुलगे, वामन आणि परशुराम..पत्नी वसू..यांच्या बरोबर दोन खणाच्या घरात सुखाने राहत होते. सुखाने आपलं म्हणायचं नाहीतर आपण खालच्या जातीचे याचं त्यानाच मनातल्यामनात वैषम्य वाटायचं..परिस्तिथी आम्हा सगळ्यांचीच सामान्य होती. काँमन व्हरांड्या प्रमाणे विचारसरणीही काँमनच होती. पण तरी जनुभाऊ मनात ही हंत कायम जोपासत होते. याचा आम्हाला कोणालाच अंदाज नव्हता. खैर हे समजण्याचं आमचं वयही नव्हतं म्हणा, जनुभाऊ काच कारखान्यात कामाला होते आणि रोज दहा पोळ्या डब्यात न्यायचे ह्याचच आम्हाला त्या वयात अप्रुप वाटायचं. जनुभाऊना याची कल्पना नव्हती ते आपले आपल्या परिस्तिथीशीच झगडण्यात व्यस्त असायचे..

साधेसुधे जनाभाऊ काळेसावळे असले तरी नाकीडोळी निटस होते.गालावर चामखिळ होती. कानावरचे केस वाळलेल्या गवता सारखे वाढलेले म्हणून जरा...पण त्यांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नसायचा. त्यांचं सगळं लक्ष आपल्या दोन्ही मुलांवर एकवटलं होतं.माझी मुलं साहेब लोकं म्हणून ळखली जातील असे त्यांचे मनसुबे होते. वसूची त्यांच्या मनातलं काही समजून घ्यायची कुवतच नव्हती. पण दोन्ही मुलाना आपल्या बापाची तडफड, धडपड कळत होत. हणून दोन्ही मुलं अगदी त्यांच्या मनासारखं वागायची. जनूभाऊना वाटायचं आपल्या मुलानी चोवीसतास अभ्यासच करावा, शुद्ध बोलायचा सराव करावा. आमच्या आईचा त्याना जरा धाक होता. ब्राम्हण घरातली बाई आपल्याशी बोलते यातच जनूभाऊना धन्य धन्य वाटायचं.मुलाना खेळायला मिळायचं. कधी सिनेमाला यायला मिळायचं. ते आमच्या आईमुळे,,,आईने सांगितलं, तर जनुभाऊंची नाही म्हणायची टाप नसे. पण खूप मेहनत घेऊनही वामनला दहावीला जरा कमी मार्क मिळाले आणि जनुभाऊ गंभीर झाले.

मग त्यानी परशुरामाला नजरेसमोरच धरला. त्याच्या साठी हरतर्हेचे पेपर, प्रश्नपत्रिका आणून देत होते.परशूचं दहावी म्हणजे सा-या शिंदेवाडीसाठी अचंब्याचा विषय ठरला होता. वामन कडून बारावीची तयारी चालू होती. पण परशू जनूभाऊंच्या तावडीत सापडल्यासारखा झाला होता. वामन मुळातच जरा गरीब शांत मुलगा होता. पण परशूचं तसं नव्हतं. अभ्यासात तो मुळातच होताच.पण खेळातही चमक दाखवायचा. क्रिकेट तर त्याचं जिव की प्राण होतं. म्हणून मुलाच्या आईला हव असताना जनूभाऊनी टी व्ही चा खोका घरात येऊन दिला नव्हता.मुलांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष्य होईल ते बजाऊन सांगायचे आणि वसूचं काही चालायचं नाही. परशूची दहावीची प्रिलीम जवळ आली आणि जनूभाऊ अधिकच व्याकूळ झाले. कधी नाही ते वाडीतल्या अव्दूंबराला रोज पाणी चढवायला लागले, प्रदक्षिणा घालायला लागले, परशूचं वेळापत्रक त्यानी त्याच्या बाईंकडून करून घेतलं आणि ते कसोशीने पाळायची जबाबदारी वामन वर टाकली. परशूराम सुद्धा ते वेळापत्रक काटेकोरपणे पाळत होता पण नेमका तेंव्हाच कसल्याशा क्रिकेटच्या टुर्नामेंटचा सिझन सुरू झाला.आणि परशूरामची सत्वपरिक्षा सुरू झाली.

कोण खेळतय, स्कोअर काय झाला असले प्रश्न मनात उचंबळत असताना त्याला फिजिक्स केमेस्ट्री रटावं लागत होतं. आणि एक दिवस उगवला तो सावट घेऊनच, ठरल्याप्रमाणे जनुभाऊ दहापोळ्या आणि भेंडीची तेलकट भाजी घेऊन कारखान्यात गेले. आता ते काही संध्याकाळी सात वाजल्याशिवाय येणार नाहीत, म्हणून मुलं जरा सैलावली त्यात सकाळपासूनच परशूरामला कण कण जाणवत होती.म्हणून ठरलेला अभ्यास पूर्ण करून दोन मिनिट रिलँक्स व्हायला तो आमच्या कडे आला. तो आला म्हणजे आई सुद्धा सुरू असलेली मालिका बंद करून त्याला मँच्य बघायला देत असे. तसच आज झालं आणि दोन मिनिटाच्या जागी परशू, पाच मिनिटं टीव्ही बघण्यात रमला त्याला बोलवायला वामन आला.

तो पण टीव्ही समोर चिकटला आणि अनर्थ झाला. कसे अचानक कोणजाणे पण परशूसाठी भुमितीचे पेपर मिळाले म्हणून जनूभाऊ ते द्यायला घरी आले आणि पाहतात तर वसू दुपारची लवंडलेली आणि दोन्ही मुलं आमच्याकडे टी व्ही समोर चिकटलेली...भावनिक भडका उडाला...मी इथे रक्ताचं पाणी करतोय आणि हे चिरंजीव?.. ते अशा तावातावाने मुलांकडे झेपावले की कोकरं जीव वाचवायला उसळतात तसे दोघे ऊडाले. सगळं एका क्षणात घडलं की विचार करायला आकलन घडायला सवडच मिळाली नाही.

वामन सुटला पण परशु निसटायच्या प्रयत्नात असताना जनुभाऊंच्या घडाळ्याचा स्टीलचा पट्टा परशूच्या कोवळ्या कानावर घासला गेला. रक्ताची चिळकांडी उडाली परशूला कण कण होतीच, रक्त बघून त्याला भोवळ आली काय करायचं मला सुचलं नाही.. मी त्याला तसाच उचललं आणि रिक्षेत उडी मारली..डाँक्टरानी हाँस्पिटलला जायला सांगितलं. तोपर्यंत रक्तानं परशू माखला होता. जनुभाऊ मागनं सायकलवर ढांग टाकून येतच होते. आम्ही हाँस्पिटलला पोहोचलो तेंव्हा वेळ साधून आल्यासारखी न्युजचँनलची माणसं हाँस्पिटलमधे घिरट्य़ा घालत होती. त्याना आयती केस मिळाली. घडलेल्या घटनेला अचानक बातमीचं स्वरूप प्राप्त झालं. जल्लाद बापाने अभ्यासावरून आपल्या मुलाला रक्ताने माखवलं.. मथळे तयार झाले, चर्च्या परिसंवादाची तयारी सुरू झाली आणि सनसनाटी क्रियेट करायच्या नादात आमचे सादेसुधे जनाभाऊ जल्लाद ठरले.

आमची कोप-यात पडलेली शिंदेवाडी अचानक प्रकाशात आली. अचानक वसू सारख्या अडाणी बाईसमोर चँनल वाल्यानी माईक धरल्यावर ती भांबावलेली बाई काहीतरी बोलून गेली. त्यापुढे परशूचा टाहो दबला गेला. आमचे बाबा खूप खूप चांगले आहेत. हे त्या पोराचे बोल पुढे आलेच नाहीत आणि जनुभाऊ जल्लाद आहेत.

यावर शिक्कामोर्तब करून तो दिवस संपला. आता किती वर्ष उलटली?... शिंदेवाडीसुद्धा मोडकळीला आली पण जनुभाऊंचं दोनखणांचं घर तेंव्हाच मोडून गेलं..वामन फार नाही शिकला. पण परशूने खूप तरक्की केली. पण जनूभाऊ कशातच नव्हते...फार बदनामी झेलावी लागली. त्याना .."मी जाऊन येऊन राहीन म्हणत जनुभाऊनी नवसारीला बदली करून घेतली आणि फारसे फिरकलेच नाहीत. एका नांदत्या घरात शुकशुकाट पसरला. लोकं काय चार दिवस चर्चा करून विसरून गेले..आणि आमचे जनुभाऊ?....हं...

- चंद्रशेखर गोखले