Sign In New user? Start here.

Chandrashekhar Gokhale Charolya

chandrashekhar gokhale तू सोबत असलीस की
मला माझाही आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही..

किती सहज आणि सोप्या वाटतात ना ह्या ओळी...! प्रेमाच्या उंबरठ्यावर असलेल्या किंवा प्रत्येक प्रेमी युगूलांच्या मनात रूजलेल्या या भावना अलगदपणे आणि साध्या-सोप्या भाषेत कागदावर प्रसिद्ध कवी चंद्रशेखर गोखले म्हणजेच चंगो गेली ३० वर्षे उतरवताहेत. त्यांचा पहिला चारोळीसंग्रह आला, तो म्हणजे ‘मी माझा’...या संग्रहाने त्यावेळी चांगलीच लोकप्रियता मिळवली होती.

Chandrashekhar Gokhale Charolya

 

चंद्रशेखर गोखले

तू सोबत असलीस की
मला माझाही आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही...

 

 

नेहमीच डोक्याने विचार करू नये
कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना
स्वप्नांचा गाव द्यावा.

 

जेव्हा तू माझा
अलगद हात धरलास
खरं सांग तेव्हा तुझ्याजवळ
तू कितीसा उरलास...

 

 

तरसण्याचा अनुभव मी
आभाळ बरसताना घेतला
तू नव्हतीस तर प्रत्येक थेंब
माझ्या अंगोपांगी रूतला...

 

 

आता मलाही जमायला लागलंय
तुझ्यासारखं वागणं
समोर असलं की गप्प राहणं
रात्री कुढत जागणं...

 

 

इथे प्रत्येकजण आपापल्या घरात
आणि प्रत्येकाचं दार बंद आहे
तरी एकोप्यावर बोलणं हा
प्रत्येकाचा छंद आहे.