Sign In New user? Start here.
a new girl entry in sidharth jadhavs life मुलगी सिध्दार्थच्या आयुष्यात आली. तर ती दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची स्वत:ची मुलगी आहे.
 
 
zagmag

सिध्दूच्या आयुष्यात अजुन एका मुलीची एन्ट्री

टायटल वाचून आर्श्चय वाटंल ना? तुम्हांला वाटत असेल की आता ही कोण मुलगी सिध्दार्थच्या आयुष्यात आली. तर ती दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची स्वत:ची मुलगी आहे. पण सिध्दुला एक मुलगी आहे हे तुम्हांला माहिती असेल पण या त्रिकोणी कुटूंबात अजून एका परीची एन्ट्री झाली आहे. सिध्दार्थ जाधवला दुस-यांदा कन्यारत्न प्राप्ती झाली आहे.

असं म्हटंल जात वडलांना नेहमी मुलगी प्रिय असते. पण कस आहे मुलगा असो वा मुलगी जेव्हा ते आपल्या पालकांच्या आयुष्यात येतात तेव्हा त्यांच आयुष्य बदलून जातं. असाच काहीसा अनुभव सध्या अभिनेता सिध्दार्थ जाधव घेत आहे. सिध्दू सध्या खूप खुशीत आहे. 6 जून रोजी मुंबईत सिद्धार्थची पत्नी तृप्तीने बाळाला जन्म दिला. नुकतेच काही दिवसापूर्वी सिध्दार्थ आणि त्याची पत्नी तृप्तीने आपल्या या नव्या परीचे थाटात बारसे केलं. या बाळाचे नाव इरा असे ठेवण्यात आले आहे. सिध्दूच्या पहिल्या मुलीचे नाव स्वरा आहे.

या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी मराठी चित्रपटक्षेत्रातील अनेक कलाकार उपस्थित होते. या मधे अभिनेता-दिग्दर्शक केदार शिंदे ,अंकुश चौधरी, कोरिओग्राफर उमेश जाधव, अभिनेत्री आदिती सारंगधर, अभिनेते जयवंत वाडकर, यांच्यासह बरेच सेलिब्रिटी ईराच्या बारशाला आले होते.

 

------------------