Sign In New user? Start here.
aala re aala hero no 1 govinda to debut in marathi movie कारण शंशाक सध्या लॉस एन्जलिसमध्ये चाललेल्या ‘बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळा’च्या १७व्या अधिवेशनाला गेला आहे. आणि तिथे चक्क दोनवर्षानंतर आपला लूकमधे बदल केले आहे.
 
 
zagmag

गोविंदा "आला रे आला" मराठी चित्रपटात आला.

मराठी चित्रपटात हिंदी कलाकारांच काम करण किंवा त्यांनी हिंदी चित्रपट निर्माण करण काही नवीन राहिल नाही. फक्त प्रेक्षकांना उत्सुकता एवढीच की आता अजून कोणते हिंदी कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. रितेश देशमुख, अजय देवगण या सारख्या हिंदी कलाकरांमधे आणखी एक नाव जोडल जातय ते म्हणजे हिरो नं १ गोविंदाच. ‘राजाबाबू’, ‘हिरो नं.१’ ‘कुली नं.१’ या सारख्या असंख्य चित्रपटात आपल्या सहज सुंदर अभिनय आणि दिलखेचक डान्सच्या स्टाईलने त्याने ९०च्या दशकात धूमाकूळ घातला होता. त्यामुळे त्याच्या या स्टाईलचे आजही अनेक चाहते आहेत.

गोविंदा सोबत या चित्रपटात जॉनी लिव्हर ही काम करणार आहे. या पूर्विही जॉनी लिव्हर "नवरा माझा नवसाचा" या चित्रपटात दिसला होता. ९० च्या दशकात गोविंदा आणि विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर ही जोडी हीट होती. या दोघांचे चित्रपट तूफान चालले.त्यामुळे या मराठी चित्रपटात खूप चांगली कॉमेडी लोंकाना पहायला मिळेल अशी आशा करण्यास तुर्त तरी हरकत नाही. या सिनेमाच्या शूटींगचं पहिलं शेड्युल संपलं असून राहिलेलं शूटींग लवकरच पार पडणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती तरूण निर्माता ज्याने बालक पालक, यलो सारखे चित्रपट निर्माण केले तो उत्तुंग ठाकूर करणार आहे. मराठी सिनेमांच कंन्टेट आणि विषय यामुळे या आधिही अनेक हिंदी कलाकारा मराठीचित्रपटसृष्टीत काम करताना दिसत आहे. रितेशचा ’लय भारी’, अजय देवगणचा विटीदांडू त्याच बरोबर शाहरूख खान, अक्षय कुमार सारखे कलाकारही मराठी चित्रपटाची निर्मितीमधे उतरले आहेत. अगदीच अलीकडे अगामी हायवे या चित्रपटात हुमा खुरेशी ,टिस्का चोप्रा काम करताना दिसनार आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटाचे अच्छेदीन आलेत असं म्हणण्यास काहीच हरकत नाही.

 

------------------