Sign In New user? Start here.
small-sachin-conned नटसम्राट पाहून आमिर म्हणाला "असा नट होणे"
 
 
zagmag

नटसम्राट पाहून आमिर म्हणाला "असा नट होणे नाही "

aamir sayas asa nat hone nahi

नानापाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाने नटलेला नटसम्राट या चित्रपटाने आमिर खानही प्रभावीत झाला आहे. त्याने या चित्रपटाबद्दल टिवीटर वर ट्विट केले आहे. तो म्हणतो की मी हा चित्रपट पाहिला, नानांचा आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाला तोड नाही. जबरदस्त चित्रपट आहे. महेश, नाना, विक्रमजी आणि संपूर्ण टीमने छान काम केल आहे.

वि. वा. शिरवाडकर यांच्या 'नटसम्राट' या अप्रतिम कलाकृतीवर आधारित महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट : असा नट होणे नाही' या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला.

प्रेक्षकांना तो केवळ आवडलाच नाही तर तो भावला. जबरदस्त अभिनय, दमदार संवादांनी परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचे बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननेही कौतुक केलेय.