Sign In New user? Start here.
actor sachin & director rajwade perform Ganapati Sthapana Puja at Umarkhadi Cha Raja सचिन पिळगावकर या सदाबहार सुपरस्टार आपण गोड चेह-याचा कलाकार म्हणूनच गेली पाच दशके ऒळखतो. त्यांच्य चेह-यावर कधी कुणी दाढीची खुंदे पाहिली आहेत? नाही ना! अगदी त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकरांनीही आतापर्यंत पाहिली नव्हती.
 
 
zagmag

“अभिनेता सचिन पिळगावकर आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी उमरखडीचा राजाची केली स्थापना."

आपल्या ‘सांगतो ऎका’ या आगामी चित्रपटाच्या यशासाठी राजवाडे यांनी डोंगरी येथील ‘उमरखाडीचा राजा’ ची २४ ऑगस्ट २०१४ रोजी गणपतीची स्थापणा पूजा केली आणि आपल्या आगामी ‘सांगतॊ ऎका’ या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली ‘उमरखडीच राजा’ आपल्या स्थापनेची ६९ वर्षे साजरी करत आहे. दरवर्षी गणेशोत्सवत प्रतिदिन तब्बल १ लाख गणेशभक्त या गणपतीचे दर्शन घेतात.

य स्थापनापूजेनंतर बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले. “मी गणपतीचा निस्सीम भक्त आहे. माझा दिवसच गणपतीच्या दर्शनाने सुरू होतो. उमरखाडीचा राजा च्या व्यवस्थापक मंडळाने मला स्थापना पूजा करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.”

actor sachin & director rajwade perform Ganapati Sthapana Puja at Umarkhadi Cha Raja

लॅण्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांचा निर्मात्या म्हणून ‘सांगतो ऎका’ या पहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात सचिन पिळगावकर यांच्यासह भाऊ कदम, वैभव मांगले, जगन्नाथ निवाणगुणे, मिलिंद शिंदे, पूजा सावंत, माधव अभ्यंकर, संस्कृती बालगुडे आणि ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा आणि संवास पराग कुलकर्णी यांचे असून संवाद संजय पवार यांचे आहेत. सुहास गुजराथी यांनी छायाचित्रणाचे दिग्दर्शन केले आहे. निखिल कोवळे यांनी कला दिग्दर्शन केले आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांनी केले आहे. ‘सांगतो ऎका’ २ ऑक्टोबर २०१४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रादर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे करत आहे. त्यांनी आतापर्यंत ‘प्रेमाची गोष्ट’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’ यांसारख्या सलग हीट ठरलेल्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

 

 

------------------