Sign In New user? Start here.
Marathi actors Off to Kuwait to collect donationमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना आणखी मदत व्हावी आणि फंड गोळा करता यावा म्हणून आज जितेंद्र जोशी आणि कलाकारांनी कुवेत साठी उड्डान केलं
 
 
zagmag

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी मराठी कलाकारांच कुवेतला उड्डाण

गायत्री तेली

Marathi actors Off to kuwait to collect donation

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना आणखी मदत व्हावी आणि फंड गोळा करता यावा म्हणून आज जितेंद्र जोशी आणि कलाकारांनी कुवेत साठी उड्डान केलं. महाराष्ट्रात दुष्काळा मुळे होणा-या शेतक-यांच्या आत्महत्या या विषयांकडे सर्वांच लक्ष वेधल ते नाना पाटेकर यांनी.

शेतक-यांना मदत म्हणून नाना पाटेकर, मकरंद आनासपुरे, जितेंद्र जोशी बरोबरच अनेक कलाकरांनी मदतीसाठी हाथ पुढे केला. भले मग मी ती रक्कम छोटी असो वा मोठी.या साठी नाम फौडेशन ची स्थापना करण्यात आली आणि मदतीचां ऒघ सुरू झाला. हे कलाकारं इथेच न थांबता आता साता समुद्रापार जाऊन या शेतक-यांसाठी मदत जमा करंत आहे.

आज जितेंद्र जोशी, स्पृहा जोशी आणि अभिनेता इंगळे यांनी कुवेत साठी उड्डाण केलं. कुवेत मधील महाराष्ट्र मंडळा कडून मदत जमा केली जाणारं आहे. या मंडळीचा दोन दिवसांचा दौरा असून १० तारखेला हे परत महाराष्ट्रात येतील. याबाबतीत जितेंद्र जोशी ने सोशल नेटवर्किंग साईट स्टेटस टाकलं आहे की Off to kuwait to collect donation for naam foundation from maharashtra mandal.. i ll be back on 10 th...महाराष्ट्राच सरकार महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत किती जागरूक आहे हे माहित नाही पण कलाकारंच हे काम अभिमानास्पद आहे

------------------