Sign In New user? Start here.
actress Ishwari deshpande'ईश्वरी देशपांडे'च्या रूपाने नवा ग्लॅमर चेहरा मराठीत.
 
 
zagmag

'ईश्वरी देशपांडे'च्या रूपाने नवा ग्लॅमर चेहरा मराठीत.......

actress Ishwari deshpande

'प्रेमाचे साईड इफेक्ट्स' या आगामी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातून 'ईश्वरी देशपांडे'च्या रूपाने एक नविन ग्लॅमर चेहरा मराठीत पदार्पण करत असून ईश्वरीचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातून ती मुख्य नायिकेच्या भूमिकेत आपणाला दिसेल. ईश्वरी सध्या पुण्यातील सिंहगड महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत आहे. वकिलीचे शिक्षण पूर्ण करुन तिला मराठीतील आघाडीची अभिनेत्री बनायचे आहे. हिंदीतील माधुरी, दिपिका, प्रियंका आणि मराठीतील स्मिता पाटील या अभिनेत्रींना ती आदर्श मानते. मला त्यांच्यासारखं व्हायचंय असे ती आवर्जून सांगते.

' प्रेमाचे साईड इफेक्ट्स' या आगामी चित्रपटासाठी तिने खुप मेहनत घेतली आहे. त्यासाठी तिने स्विमिंग, हॉर्स राइडिंग, बाईक राइडिंग, नृत्य अशा कलेत ती पारंगत झाली आहे. या चित्रपटाकडून तिला खुप अपेक्षा आहेत. कारण तिने या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली आहे. सध्याचे मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव, संजय जाधव, उमेश कुलकर्णी, सुजय डहाके यांच्या सोबत तिला काम करायचे आहे अशी तिने इच्छा व्यक्त केली.

या चित्रपटात तिच्या बरोबर दिपक शिर्के, रवी काळे, किशोरी अंबिये, सुप्रिया पाठक असे दिग्ग्ज कलाकार असून ईश्वरी देशपांडे बरोबर पृथ्वीक कांबळे हे दोन नवे चेहरे रूपेरी पडद्यावर आपणास दिसतील.

'ईश्वरी' फिल्म एन्टरटेंमेंन्ट प्रस्तुत व जयश्री देशपांडे निर्मित ' प्रेमाचे साईड इफेक्ट्स' चित्रपटाचे दिग्दर्शन सुनिल चौथमल यांचे असून लेखक अभिजीत हरिचंद्रन हे आहेत. छायाचित्रण रवी चंदन यांचे आहे. संगीतकार देव आशिष हे असून या चित्रपटात पाच गीते आहेत. गीत लेखन अभिजीत कुलकर्णी व हरिचंद्र यांची आहे. गायक बेला शेंडे, जावेद अली, पामिल जैन, विकी इंडियन अशा आणखी काही गायकांचा आवाज गीतांना लाभला आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल असे निर्मात्या जयश्री देशपांडे यांनी सांगितले.

------------------