Sign In New user? Start here.
ketaki mategaonkar new movie अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या बाबतीत. ‘प्रेमाची गोष्ट’ हा सिनेमा पाहिल्यापासून तिला अतुल कुलकर्णीसोबत रोमँटिक सिनेमा करण्याची तिची इच्छा होती.
 
 
zagmag

अतुलसोबत रोमांस करण्याचं पल्लवीचं स्वप्न पूर्ण

अनेक नव्या अभिनेत्रींना आपण एखाद्या ग्लॅमरस हिरो सोबत काम करावं, असं नेहमीच वाटतं. त्यात काही नवल नाही. पण अशीच भावना एखाद्या प्रस्थापित, प्रसिद्ध अभिनेत्रीनेही मनोमन जपली तर..? असच काहीसं घडलंय मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या बाबतीत. ‘प्रेमाची गोष्ट’ हा सिनेमा पाहिल्यापासून तिला अतुल कुलकर्णीसोबत रोमँटिक सिनेमा करण्याची तिची इच्छा होती. मात्र, अतुल ज्या प्रकारचे चित्रपट करतो, ते पाहाता ही इच्छा पूर्ण होईल की नाही, याबाबत तिला शंका होती. मात्र, लवकरच प्रदर्शित होणा-या ‘हॅप्पी जर्नी’ या चित्रपटाच्या निमित्त अनपेक्षितपणे तिची ही इच्छा पूर्ण होणार आहे.

पुढील महिन्यात २८ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असून त्यात पल्लवी सुभाष आणि अतुल कुलकर्णी ही फ्रेश रोमँटिक जोडी पाहायला मिळणार आहे. या सिनेमात अतुल आणि प्रिया बापट हे बहिण-भावाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ‘गंध’, ‘रेस्टॉरंट’, ‘अय्या’ असे हटके चित्रपट देणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सचिन कुंडलकर याच्या या चित्रपटाची निर्मिती ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’ आदी यशस्वी चित्रपटांचे निर्माते संजय छाब्रिया यांच्या ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ने केली आहे.

यासंदर्भात पल्लवी म्हणाली, “अतुल आणि मी कधी एकत्र काम केलं नसलं तरी आम्ही खूप आधीपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. त्याचा प्रत्येक सिनेमा मी बघते. त्याची खूप मोठी फॅन असल्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा होतीच. त्यातच मी त्याचा ‘प्रेमाची गोष्ट’ हा सिनेमा पहिला. त्यातली त्याची रोमँटिक भूमिका मला इतकी भावली की, त्याच्यासोबत आपल्यालाही असाच रोमांस करायला मिळाला तर किती बहार येईल, असं मला तीव्रतेने वाटलं. पण एक तर तो खूप मोजके चित्रपट करतो; शिवाय एकाच पद्धतीचे चित्रपट तो वारंवार करत नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर रोमँटिक चित्रपट करण्याची आपली इच्छा काही पूर्ण होणार नाही, असंच मला वाटत होतं. मात्र, अचानक ‘हॅप्पी जर्नी’च्या निमित्ताने ही संधी चालून आली आणि अतुलसोबत रोमांस करण्याची इच्छा पूर्ण झाली.”

 

------------------