Sign In New user? Start here.
adinath and urmila celebrate dogs birthday "उर्मिला आणि आदिनाथ ने सेलिब्रेट केला ’पेपर’ चा वाढदिवस
 
 
zagmag

"उर्मिला आणि आदिनाथ ने सेलिब्रेट केला ’पेपर’ चा वाढदिवस"

adinath and urmila celebrate dogs birthday

आजकल सर्वांनाच सेलिब्रेशनसाठी काहितरी निमित्त हवं असतं. मग ते कोणाच्या वाढदिवसाचं असो किंवा सक्सेसच असो, सेलिब्रेशन तो बनता है बॉस..! अस काहीस आजकल झालं आहे. एवढं सगळ सांगण्या मागच कारण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील क्यूट कपल समजलं जाणारे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी नुकतच असं सेलिब्रेशन केलं.

adinath and urmila celebrate dogs birthday

हे सेलिब्रेशन होतं त्यांच्या लाडक्या कुत्र्याच्या वाढदिवसाचं. त्यांचा लाडका कुत्रा ’पेपर’ हा दोन वर्षाचा झाला म्हणून हे सेलिब्रेशन करण्यात आलं. महत्वाच म्हणजे या वाढदिवसाला मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी हे कपल ही आपल्या कुत्र्याला घेऊन या पार्टीमध्ये सहभागी झाले आणि त्याच बरोबर फुलवा खामकर आणि तिची मुलगी आसमा खामकर ही आपल्या कुत्र्यासोबत या पार्टीसाठी आल्या होत्या.

adinath and urmila celebrate dogs birthday
या बर्थडे सेलिब्रेशनचे काही खास फोटॊ उर्मिला कानटेकरने सोशल नेटवर्किंगवर शेअर केले आहेत. या सेलिब्रेशन वरून तरी असं वाटतं हर कुत्ते का दिन आता है, आणि तो कुत्रा सेलिब्रेटीचा असेल तर मग विचारायलाच नको.
------------------------------------------.