Sign In New user? Start here.
ankush fractured his hand  आदिती राव हैदरी. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित आगामी “रमा माधव” या चित्रपटात ती मुजरा करताना दिसणार आहे.या गाण्याची कोरीऒग्राफी सरोज खान यांनी केल आहे.

aditi rao hydari now perform in marathi film

 
 
zagmag

मृणालच्या ‘रमा माधव’ मध्ये आदिती राव-हैदरी

मराठी चित्रपटसृष्टी सध्या बॉलिवूडमध्ये खूप गाजतीए. मराठी चित्रपटात काम करण्यास आवडेल असा प्रत्येक हिंदी कलाकार म्हणतोय. याचा प्रत्यय आपल्या आता येणार आहे. रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ सिनेमात सलमान खान दिसणार आहे हे आपल्याला माहिती आहे पण आता आणखी एक हिंदी कलाकार मराठी चित्रपटात परफॉर्मन्स देणार आहे. ती म्हणजे आदिती राव हैदरी. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित आगामी “रमा माधव” या चित्रपटात ती मुजरा करताना दिसणार आहे.या गाण्याची कोरीऒग्राफी सरोज खान यांनी केल आहे.

‘रमा माधव’ हा चित्रपट 1760 च्या कालखंडावर बेतलेला आहे. हा काळ मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. त्या वेळी पुण्यात विशेष समारंभ आणि कार्यक्रमांसाठी नर्तिकांना आमंत्रित केलं जायचं.हे गांण करण्यासाठी प्रशिक्षीत ट्रेंड क्लासिकल डान्सरची आवश्यकता होती. यासाठी सरोज खान यांनी मृणाल कुलकर्णी यांना आदितीचं नाव सुचवलं. हिंदी भाषेतलं हे गाणं वैभव जोशी यांनी लिहिलं आहे. ‘लूट लियो मोहे शाम सवरिया, बर्बस जमुना किनारे’ असे या गाण्याचे बोल आहेत. माधवराव पेशवे यांचे काका रघुनाथराव यांच्या आवडत्या नर्तिकेच्या भूमिकेत अदिती दिसेल. लाल रंगाची लेहेंगा-चोली आणि भरगच्च दागिन्यांमध्ये सजलेली आदिती यात पाहायला मिळेल. या गाण्यात अदितीसोबत प्रसाद ओकही दिसेल. आदितीचं हे नृत्य चित्रपटाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल यात काही शंकाच नाही.

------------------