Sign In New user? Start here.
aditya narayan sing a song for marathi movie' कॅरी ऑन मराठा या सिनेमाचे प्रोमोशनल साँग आदित्यने मराठीत पहिल्यांदा गायले असून सिनेमाचे संगीत दिग्दर्शन शैल आणि प्रीतेश या जोडगोळीने केले आहे..
 
 
zagmag

आदित्य नारायणचे मराठीत पदार्पण

सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणचे देखील मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले आहे. कॅरी ऑन मराठा या सिनेमाचे प्रोमोशनल साँग आदित्यने मराठीत पहिल्यांदा गायले असून सिनेमाचे संगीत दिग्दर्शन शैल आणि प्रीतेश या जोडगोळीने केले आहे.

ऐकताच क्षणी थिरकायला लावणाऱ्या तुफान गाण्याचं आज गोरेगाव येथील पाटकर महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. याप्रसंगी कॅरी ऑन मराठा सिनेमातील प्रमुख भूमिकेत असणारे अभिनेता गश्मीर महाजनी, कश्मीरा कुलकर्णी, दिग्दर्शक संजय लोंढे, नंदा आर्ट्सचे निर्माते अमित ठाकूर, वॉरियर ब्रदर्स मोशन पिक्चर्सचे निर्माते विजय क्षीरसागर उपस्थित होते.

या सिनेमा आणि गाण्याविषयी विध्यार्थ्यांमध्ये खूप उत्सुकता होती त्यात आदित्यच्या जोशपूर्ण गाण्याने कार्यक्रमात अधिकच जान आली. महाविद्यालयातील विध्यार्थ्यांसोबत गश्मीर आणि काश्मीर देखील उस्फुर्तरित्या पाहताच सरशी सहभागी झाले. तुफान, धडाकेबाज आणि एंटरटेनमेंटचा भरपूर मसाला असलेली ही प्रेमकथा कॅरी ऑन मराठा सिनेमाच्या निमित्ताने २४ जुलै रोजी महाराष्ट्र आणि बेळगावात प्रदर्शित होणार आहे.

 

------------------