Sign In New user? Start here.
after 33 yrs girish karnad now in marathi cinemaउंबरठा १९८२ ला प्रदर्शित झाला त्याला २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले , त्यानंतर १९८७ ला 'मालगुडी डेज' या मालिकेत काम केले आणि थेट आता एवढ्या वर्षानंतर ३३ वर्षांनी जरी पुन्हा मराठी सिनेमा मला बोलवितो आहे.
 
 
zagmag

गिरीश कर्नाड ३३ वर्षानंतर मराठी सिनेमात

after 33 yrs girish karnad now in marathi cinema

तुझेच मी गीत गात आहे

अजूनही वाटते मला की,

अजूनही चांदरात आहे…

सुन्या सुन्या मैफलीत माझ्या…

हे गाणे अजूनही ह्रदयात आहे ,तुमच्या पुण्याची अभिनेत्री जिने १९७३ मध्ये ' अर्धसत्य' १९७४ मध्ये' सामना ' १९७८ मध्ये 'सर्वसाक्षी ' सारखे चित्रपट केलेत्या स्मिता पाटील यांच्याबरोबर मी केलेला 'उंबरठा ' हा माझ्या आयुष्यातला 'सुवर्णकाळ' आहे . काही आठवणी माणसाला जगवतात अशा 'उंबरठा' च्या आठवणी आहेत. उंबरठा १९८२ ला प्रदर्शित झाला त्याला २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले , त्यानंतर १९८७ ला 'मालगुडी डेज' या मालिकेत काम केले आणि थेट आता एवढ्या वर्षानंतर ३३ वर्षांनी जरी पुन्हा मराठी सिनेमा मला बोलवितो आहे. त्यामुळे मला सांगावेसे वाटते …

'सख्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे

उभा तुझ्या अंगणी स्वरांचा, अबोल हा पारिजात आहे !

गिरीश कर्नाड बोलत होते …सुरेश भट यांचे गीत आणि हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत असलेले गीत त्यांच्या मनी गुंजू लागले , मराठी चित्रपटा विषयीचे , संगीताविषयी त्यांचे प्रेम मराठीत पुनश्च पदार्पणाने जणू पुलकित झाले होते .बेंगलोर मध्ये राहणाऱ्या गिरीश कर्नाड यांची नुकतीच दिग्दर्शक शिव कदम आणि निर्माते महेंद्र केसरी यांनी भेट घेतली आणि एम के धुमाळ ,प्रसाद पुसावळे या निर्मात्यांना घेवून सुरु करीत असलेल्या 'सरगम ' या मराठी चित्रपटात कर्नाड यांना भूमिका करण्याची विनंती केली . 'उंबरठा' नंतर कधी चांगला मराठी चित्रपट येतो याची मी वाट पाहत होतोच पण खूप काळ गेला, मला तुम्ही चांगली कथा दिली आणि भूमिकाही … त्यामुळे मीच तुमचा आभारी आहे.

कर्नाड मराठी सिनेमाच्या प्रेमाने भारावून गेले होते त्यांच्या आठवणी पिंगा घालू लागल्या पद्मश्री ,पद्मभूषण , ज्ञानपीठ पुरस्कारांसह कालिदास सन्मान , कन्नड साहित्य अकादमी पुरस्कार असे असंख्य नामांकित पुरस्कार विजेते असलेले कर्नाड केवळ नाटककार , अभिनेता , निर्माता लेखक च नाहीत तर सामाजिक समस्यांवर उचित भाष्य करणारे मोठे साहित्यिक आहेत .संगीत नाटक अकादमी, पुण्याच्या एफ टी आय आय च्या अध्यक्षपदी त्यांनी काम केले .

महाराष्ट्राच्या मातीतच माथेरान इथे जन्म झालेल्या कर्नाड यांना कवी होण्याची इछ्या होती पण कर्नाड इंग्लंड ला ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले तिथूनच त्यांना नाटकाचे आकर्षण वाटू लागले , चेन्नई , शिकागो इथे प्रोफेसर म्हणून काम केल्यानंतर ते पूर्णवेळ नाटकांकडे वळले. १९६१ नंतर ययाती , तुघलक अग्नी ओर बरखा , नागमंडळ , अंजू मल्लिगे ,हयवदन अशी अनेक नाटके गाजली १९७० मध्ये 'संस्कार ' नावाच्या कन्नड चित्रपट पासून त्यांची फिल्मी सफर सुरु झाली . शेखर सुमन आणि रेखा यांची भूमिका असलेला 'उत्सव 'अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे त्याचे दिग्दर्शन कर्नाड यांनी केले ,'हे राम ,पुकार , आक्रोश, मेरी जंग , मिल्गायी मंझील मुझे , स्वामी, इक्बाल अलीकडे 'एक था टायगर'अशा हिंदी , मल्याळम , तेलगु ,तमिळ, मराठी अशा ७० हून अधिक चित्रपटात कर्नाड यांनी भूमिका केल्या.

आगामी मराठी चित्रपट 'सरगम ' च्या निमित्ताने आता ते पुन्हा मराठीत दिसतील . या चित्रपटात ते जंगलात भटकणाऱ्याएका अवलियाची भूमिका साकारणार आहेत . अहमदनगर-अकोल्या नजिकच्या भंडारदरा येथे या चित्रपटाच्या चित्रीकरणात ते दिसतील आणि पुन्हा मराठी रसिकांच्या मनात 'सरगम ' छेडतील अस विश्वास निर्माते एम के धुमाळ आणि दिग्दर्शक शिव कदम यांनी व्यक्त केला आहे .

 

------------------