Sign In New user? Start here.
"आकाश संस्कृती सोबत इटलीमध्ये"
 
 
zagmag

आकाश संस्कृती सोबत इटलीमध्ये

akash and sanskurti together

सैराट मधील आकाश सध्या कुठे आहे असा प्रश्न नक्कीच पडला असेल. तर सध्या आपल्या खास मैत्रीणी सोबत इटलीमध्ये शुटमध्ये बिझी आहे. बरं तुम्हाला वाटत असेल की अर्ची सोबत म्हणजेच रिंकू राजगुरू सोबत असेल तर गैरसमज नसावा. कारण तो सध्या तो संस्कृती बालगुडे सोबत सध्या इटलीमध्ये शुट करत आहे.

दोघांचा हा लेटेस्ट फोटो आहे . दोघेही दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या आगामी 'एफ यू' या चित्रपटात लवकरच एकत्र दिसणार आहेत. सध्या या सिनेमाचे शूटिंग इटलीत सुरु आहे. शूटिंगच्या फावल्या वेळेत क्लिक झालेला दोघांचा हा फोटो संस्कृतीने आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 'एफ यू' या आगामी सिनेमात आकाश आणि संस्कृतीसोबत महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर आणि अभिनेत्री माधुरी देसाई हे ही महत्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

'सैराट' या सिनेमाने आकाशला एका रात्रीत स्टार झाला. आता आकाशचा एफयू नावाचा हा दुसरा सिनेमासुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय. या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने आकाश सध्या परदेशवारी करतोय. संस्कृतीलासुद्धा मोठ्या बॅनरच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे.