Sign In New user? Start here.
dhanshri kadgavkar in new filmआकाश ठोसरचा नवीन चित्रपटाच्या टीजर पोस्टर सलमानने केले लॉन्च
 
 
zagmag

आकाश ठोसरचा नवीन चित्रपटाच्या टीजर पोस्टर सलमानने केले लॉन्च

नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारावर मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली आणि त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्यातच, आज अजूनच सळसळत्या चैतन्याची भर पडली आहे ! त्याला कारणही तसं जबरदस्त आहे ! महेश मांजरेकरांचा बहुचर्चित आगामी ‘F.U.’ या चित्रपटाचे ‘टीजर पोस्टर’, बॉलिवुड सुपरस्टार आणि महेश मांजरेकरांचा खास मित्र सलमान खान याने आज ट्वीट केले आहे.

या पोस्टर मध्ये आजकालच्या तरुणांचा ‘yo स्टाइल’- स्टायलिश हात दिसत आहे ! हातामध्ये फॅशनेबल लेदरचे ब्रेसलेट आणि तरुणांचे फेवरेट लेदर जॅकेट दिसत आहे ! ‘He is back’ असे ठळकपणे लिहिलेल्या या पोस्टरवरून नक्कीच एक प्रश्न पडतोय की सैराट मधून लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेला ‘चॉकलेट बॉय’, आकाशचा ‘F.U.’ या नव्या चित्रपटात नक्की कसा लूक असेल?

शिवाय, ‘F.U.’ चे पुढील पोस्टर १४ एप्रिलला सकाळी ११.३५ ला सोशल मिडियावर लॉन्च होईल ! प्रेक्षकांना पुढच्याही पोस्टरची जबरदस्त उत्सुकता लागलीये म्हणे कारण त्या पोस्टर मध्ये तरी आकाशचा नवा लूक दिसेल का ? आकाशचा नवा लूक आणि महेश मांजरेकरांचा नवा सिनेमा, म्हणजे तो भन्नाटच असणार आहे अशी जोरदार चर्चा सिनेसृष्टीत चालू आहे ! त्यामुळे ‘F.U.’ हा, भन्नाट नावाचा भन्नाट चित्रपट, २ जूनला प्रदर्शित होईपर्यंत, सोशल मिडियावरील या चित्रपटाच्या भन्नाट पोस्ट्स पाहण्याची आणि शेयर करण्याची सगळ्यांना जबरदस्त उत्सुकता लागून राहिली आहे !

------------------