Sign In New user? Start here.
 Amitabh Bachchan अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांची खास भेट घेतली.बीग बी यांनी सकाळी लवकर सुलोचना दिंदीच्या घरी जाऊन सरप्राईज दिले
 
 
zagmag

वाढदिवसा निमित्त 'बिग बीं'नी दिलं सुलोचना दिदींना सरप्राईज

 Amitabh Bachchan

खूपदा माणूस वयाने आणि कर्तृत्वाने जसा मॊठा होतो तसा जुन्या गोष्टी विसरून जातो. पण काही जण याला अपवाद असतात. आणि त्या व्यक्तीचे पाय सदा जमिनीवर असतात म्हणूनच की काय ते आयुष्यात खूप मोठे होतात. एवढा सगळा संदर्भ देण्याचं एकच कारण म्हणजे. गुरूवारी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणा-या खास करून आईचा रोल करणा-या सुलोचना दिंदीचा वाढदिवस. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. पण अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांची खास भेट घेतली.

बीग बी यांनी सकाळी लवकर सुलोचना दिंदीच्या घरी जाऊन सरप्राईज दिले. आणि त्यांना मोठेपणाचा मान देत ते त्यांच्या पाया पडले. त्यांनी दिंदीन सोबत काही वेळ गप्पा मारल्या. बीग बी म्हणतात सुलोजना दींदीचा आज ८६ वा वाढदिवस! मी त्यांना सरप्राईज करायला त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या आशिर्वाद घेतला तो एक भावनिक क्षण होता. त्या आजही तेवढ्याच ग्रेसफूल आहेत.

 

------------------