Sign In New user? Start here.
'amol kolhe and shruti marathe on screen couple in rama madhav चित्रपटाच्या सेटवर शुटिंग दरम्यान, कलाकारांमध्ये एकप्रकारचे बॉंडींग निर्माण होत आणि यातूनच नविन नाती निर्माण होतात ती म्हणजे मैत्रीची. अशाच क्लासमेट चित्रपटाच्या सेटवर. चित्रपट शुट करता करता सर्व कलाकारांमध्ये क्लासमेट सारख बॉंडींग झाल आहे.
 
 
zagmag

“रमा माधव चित्रपटात अमोल कोल्हे आणि श्रृती मराठे ही नविन जोडी

आजवर अनेक ऐतिहासिक मालिका आणि चित्रपटांमधून दमदार भूमिका साकारणाऱ्या या दोन्ही हरहुन्नरी कलावंतांनी आपल्या याही भूमिकांमध्ये समरसतेने अभिनय केलाय. रमा माधव या चित्रपटात सदाशिवरावभाऊची व्यक्तिरेखा अमोल कोल्हे यांनी साकारली असून श्रुती मराठे या पार्वतीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. अलोक राजवाडे आणि पर्ण पेठे ही नवोदीत जोडी या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतेय. प्रेक्षकांना नवीन काही देण्याच्या उद्देशाने आणि प्रेमकथेची गरज ओळखून मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या 'रमा माधव' या ऐतिहासिक चित्रपटात या नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. अलोक राजवाडे यांनी माधवराव पेशवे यांचा जीवनप्रवास साकारला आहे. विशेष म्हणजे या सिनेमात रमाबाईंच्या भूमिकेत बालपणीचा काळ बालकलाकार श्रृती कार्लेकर हिने साकारला असून तरुणपणीची व्यक्तिरेखा पर्ण पेठे हिने सहजसुंदर साकारली आहे. याशिवाय या सिनेमात सुचित्रा बांदेकर, योगेश सोमण, अन्वय बेंद्रे, सुनील गोडबोले, महेश पाटणकर, ज्ञानेश वाडेकर, संतोष सराफ, आनंद देशपांडे या कलाकारांच्या देखील भूमिका आहेत.  

चित्रपटाची कथा मृणाल कुलकर्णी यांनी लिहिली असून पटकथा मनस्विनी लता रवींद्र तर संवाद मनस्विनी लता रवींद्र व दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेत. 'शिवम जेमिन एंटरप्राइज प्रा. लि.' प्रस्तुत, या चित्रपटाची सह निर्मिती अशोक जोशी यांची आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिवंगत गीतकार सुधीर मोघे यांची गीतरचना आणि संगीतकार आनंद मोडक यांच्या सुरेल संगीताचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. वैभव जोशी यांनी देखील या चित्रपटासाठी गीते लिहिली असून संगीत संयोजन नरेंद्र भिडे यांनी केले आहे. ऐतिहासिक सिनेमाचा पेशवाईचा कालखंड दाखविणारे भव्य सेटचे कलादिग्दर्शन नितीन देसाई यांनी केले आहे. चित्रपटातील ऐतिहासिक व्यक्तिरेखांना साजेशी वेशभूषा पूर्णिमा ओक यांनी केली असून रंगभूषा विनय सूर्यवंशी यांनी केली आहे. पानिपतची लढाई या सारख्या साहसदृश्यांचे दिग्दर्शन रवी दिवाण यांनी केलंय. हिंदीतील ख्यातनाम नृत्यदिग्दशिका सरोज खान यांनी अदिती राव हैदरी यांच्यावर कोरिओग्राफ केलेला मुजरा हे या चित्रपटाचे आणखी एक आकर्षण ठरणार आहे. जयंत जठार यांचे संकलन तर राजीव जैन यांचे नेत्रसुखद छायाचित्रण चित्रपटाला लाभले आहे.   

------------------