Sign In New user? Start here.
 Amruta Khanvilkar to get married with himmanshoo Malhotra जितेंद्र तयार झाला आहे तो "प्रेमासाठी कमिंग सून" ह्या सिनेमातल्या राऊडी डायलॉगबाजीसाठी...
 
 
zagmag

"स्पृहा नंतर आता अमृताच लग्न"

तुळशीच लग्न झाल्यानंतर बहुदा अनेक प्रेमी युगलांना किंवा लग्न इच्छुक मुला मुलींना लग्नाचे वेध लागतात. त्याला मराठी इंडस्ट्री ही अपवाद नाही. अगदी अलीकडेच स्पृहा जोशी आणि वरद लघाटे लग्नाच्या बेडीत अडकले. त्या पाठोपाठ अभिनेता पुष्कर जोग आणि जस्मिन ब्रम्हभट्ट, अभिनेत्री रिमा लागू यांची कन्या मृण्मयी हिचेही 1 डिसेंबर रोजी लग्न झाले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आता कोणती जोडी लग्नांच्या बंधनात अडकणार आहे तर त्याचं उत्तर आहे अमृता खानविलकर. अमृता जानेवारी 2015 मध्ये टीव्ही स्टार हिमांशू मल्होत्रा बरोबर विवाहबद्ध होतेय.

अमृता आणि हिमांशू हे दोघ 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज' या शोमध्ये भेटले आणि तिथेच ख-या अर्थाने या दोघांचे सूर जुळले. या दोघांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबाकडून परवानगी मिळाली असून वसंतपंचमीच्या शुभमुहूर्तावर हे दोघ लग्न करणार आहेत.

 

------------------