Sign In New user? Start here.
"अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे ‘ऑटोग्राफ’च्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र’
 
 
zagmag

" अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे ‘ऑटोग्राफ’च्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र

ankush chudhari and satish rajwade

अंकुश चौधरी आणि सतीश राजवाडे यांनी २००९ मध्ये ‘गैर’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम केले आहे. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला होता आणि मराठीतील तो एक मैलाचा दगड ठरलेला चित्रपट मानला गेला होता. आता ही जोडगोळी पुन्हा एकदा आणखी एक जादुई चित्रकृती घेऊन आली आहे. ‘ऑटोग्राफ’ हा त्यांचा आगामी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १२ ऑगस्ट २०१६ रोजी प्रदर्शित होत असून तोसुद्धा हिट ठरेल असे म्हटले जात आहे.

२०१५ या वर्षात अंकुश चौधरीने तीन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. डबल सीट, दगडी चाळ आणि क्लासमेट हे त्याचे गेल्या वर्षीचे गाजलेले चित्रपट असून तो आता ‘ऑटोग्राफ’मध्ये मध्यवर्ती भूमिकेत आहे. हा चित्रपट बहुआयामी प्रतिभा असलेले सतीश राजवाडे दिग्दर्शित करत आहेत. ‘मुंबई पुणे मुंबई २’ हा त्यांचा नुकताच येऊन गेलेला गाजलेला चित्रपट.

एसटीव्ही नेटवर्क्सने ‘ऑटोग्राफ’ची निर्मिती केली आहे आणि अंकुशबरोबर चित्रपटात आणखीही अनेक गाजलेले चेहरे आहेत.

दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले कि, “अंकुशबरोबर पुन्हा एकदा काम करताना खूपच मजा आली. तो नेहमीच एक सुपरस्टार आणि एक चांगला कलाकार राहिला आहे. चित्रपटाच्या संकल्पनेने मला प्रेरित केले आणि तो करायचा मी ठरवले. तो एक संपूर्णतः व्यावसायिक चित्रपट आहे. ही एक अशी प्रेमकथा आहे की जी प्रत्येकालाच आवडेल. मला प्रेमकथेवर बेतलेले चित्रपट करायला आवडतात कारण ते निरंतन असतात. ‘ऑटोग्राफ’ प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालेल एवढे निश्चित. एसटीव्हीचे संस्थापक श्री इंदरराज कपूर यांचा मी खूप खूप आभारी आहे कारण त्यांना एक दृष्टी तर आहेच पण त्याचबरोबर त्यांनी माझ्यावर एक निर्माता म्हणून या चित्रपटासाठी आणि निर्मितीदरम्यान खूप विश्वास टाकला.”

एसटीव्हीचे संस्थापक आणि या चित्रपटाचे निर्माते श्री इंदरराज कपूर म्हणाले की, “या चित्रपटाचा विषय मला खूप भावला आणि त्याने मी प्रभावित झालो. ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ या माझ्या यापूर्वीच्या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर मी चांगल्या कथेच्या शोधात होतो आणि ‘ऑटोग्राफ’च्या माध्यमातून मला ती मिळाली.”

एसटीव्ही नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड ही महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये २५० चित्रपटगृहांची मालक कंपनी आहे. निर्मिती, वितरण आणि प्रदर्शन या सर्वच बाबतीत ती एक खूपच आदर असलेली आणि आघाडीची कंपनी आहे. ‘मेरी कॉम’, ‘जिद’ आणि ‘संता बंता’ तसेच ‘भाग मिल्खा भाग’, ‘क्या कुल है हम’, ‘मस्तीजादे’ या चित्रपटांचे वितरण राष्ट्रीय पातळीवर तिने केले आहे. हॉलीवूडच्या ‘मिशन इम्पोसिबल’, ‘टीएमएनटी’ आणि ‘हर्क्युलस’ या चित्रपटांचेही कंपनीने वितरण केले आहे. त्याशिवाय कंपनीने ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ या गाजलेल्या चित्रपटाचेही वितरण केले आहे. एसटीव्ही त्याशिवाय नियमितपणे मराठी चित्रपटांचे वितरण करत आली आहे. ‘मितवा’, ‘शॉर्टकट’, ‘शटर’, ‘उर्फी’ आणि ‘बंध नायलॉन’चे आदि चित्रपटांचा त्यांत समावेश आहे.

I love u Monekaka

------------------------------------------.