Sign In New user? Start here.
prathana now in hindi films "आर्ची परश्या होणार करोडपती?
 
 
zagmag

आर्ची परश्या होणार करोडपती?

archi & parsha now become a carodpati

गेल्या काही दिवसांपासून आर्ची आणि परश्याला एक करोड रूपये देण्यात येणार आहेत अशा अफवा उठवल्या जात होत्या. सैराट चित्रपटाने आत्तापर्यंत 60 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. त्यामुळेच या चित्रपटातील मुख्य भूमिका करणारी रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांना या दोन्ही कलाकारांना प्रत्येकी पाच कोटींचा बोनस देण्यात येणार असल्याचे वृत्त ‘मुंबई मिरर’मध्ये हे प्रकाशित झाले. याविषयी झी स्टुडिओने मात्र अधिकृत घोषणा केलेली नाही. झी स्टुडिओशी संपर्क साधला असताना त्यांनी हे वृत्त फेटाळले आहे. बोनस देण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे ‘झी स्टुडिओ’तर्फे सांगण्यात आले.

सोशल मीडियावर बातमी पसरली होती, की नागराज मंजुळे रिंकू आणि आकाशला प्रत्येकी एक कोटी रुपये तर तानाजी आणि अरबार यांना प्रत्येकी दहा लाख रुपये देणार आहेत.आता 'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार मात्र रिंकू आणि आकाश कोट्यधीश होणार आहे. खरंतर सुरुवातीला रिंकू आणि आकाशला 4 लाख रुपयांना साईन करण्यात आले होते. पण आता त्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनचे सीईओ नितीन केणी आणि ‘झी स्टुडिओ’चे बिझनेस हेड निखिल साने यांनी केली असल्याचे मुंबई मिररने म्हटले आहे. बोनस चित्रपटातील इतर कलाकारांना काही रक्कम देणार असल्याचे केणी यांनी सांगितल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे.

------------------------------------------.