Sign In New user? Start here.
aruna shanbag role done by gauri konge अरुणा शानबाग हिच्या सत्य कथेपासून प्रेरित अशी "आसावरी पाटील" ही व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर साकारण्यात आली आहे. ही भूमिका अभिनेत्री गौरी कोंगे हिने साकारली आहे..
 
 
zagmag

 गौरी कोंगेने साकारली अरूणा शानबाग यांची भूमिका

aruna shanbag role done by gauri konge

राजेश रणशिंगे दिग्दर्शित ‘जाणिवा’ हा मराठी सिनेमा उद्या शुक्रवारी 31 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात स्व. अरुणा शानबाग हिच्या सत्य कथेपासून प्रेरित अशी "आसावरी पाटील" ही व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर साकारण्यात आली आहे. ही भूमिका अभिनेत्री गौरी कोंगे हिने साकारली आहे. या चित्रपटातील तिचा लूक आणि तिचा अभिनय पाहिल्यावर वर ती किती चांगली अभिनेत्री आहे हे तुम्हाला जाणवेल. ही भूमिका साकारण्यासाठी गौरीने बरीच मेहनत घेतली आहे. गौरी सांगते की यारोलसाठी तिने खूप दिवस अरुणा शानबाग यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाहिले. तिने तिच्या चेह-यावरचे हावभाव यांचा आभ्यास केला. गौरी म्हणते की ही भूमिका पडद्यावर साकारण माझासाठी खूप अव्हानात्मक होत. पण एक अभिनेत्री म्हणून मी नेहमी असे चॅलेजेंस स्विकारत आली आहे. आणि प्रत्येक भूमिका काहीना काही शिकवत असते त्यामुळे या भूमिकेतून ही मी खूपकाही शिकले.

या चित्रपटाची कथा समीर व त्याचे मित्र अशा पाच तरुणांच्या अवती-भोवती फिरते. हे पाच मित्र एका ग्रुप बँडच्या आधारे, समाजामध्ये गाण्यांच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करण्याचे कार्य करत असतात व सामाजिक कार्य करण्यासाठी फंड जमा करतात. समीर व त्यांच्या मित्रांना जेव्हा आसावरी पाटीलबद्दल घडलेली घटना समजते, तेव्हा त्यांच्या जीवनात एक प्रकारचे वादळ निर्माण होते. वेगळ्या कथानकाचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी निर्मात्यांना खात्री आहे. या सिनेमात अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. याशिवाय वैभवी शांडिल्य, अनुराधा मुखर्जी, देवदत्त दानी, संकेत अग्रवाल, किरण करमरकर, रेणुका शहाणे, अतुल परचुरे, इंदिरा कृष्णन, उषा नाडकर्णी, किशोर कदम हे कलाकार आहेत. तर महेश मांजरेकर स्पेशल अपिअरन्समध्ये झळकणार आहे.

 

------------------