Sign In New user? Start here.
small-sachin-connedस्टन्ट गर्ल' आरुषी धोत्रेचे मराठी चित्रपटात पदार्पण
 
 
zagmag

स्टन्ट गर्ल' आरुषी धोत्रेचे मराठी चित्रपटात पदार्पण

arushi dhotre in marathi film

चित्रपटामध्ये 'साहस दृश्ये' करणे म्हणजे एक मोठे आव्हानच असते. 'बॉलीवूड' मध्ये अक्षयकुमार सारखे कलाकार स्वत: अनेक प्रकारचे 'साहस दृश्ये' ( 'स्टन्टस' ) करीत असतात. मराठी चित्रपटसृष्टीत देखील काही कलाकारांचा स्वत:च साहसदृश्ये करण्याचा आग्रह असतो. परंतु आता मराठी चित्रपटात चक्क एक अभिनेत्री अशी 'साहसदृश्ये' करताना पाहायला मिळणार आहे. या नवोदित अभिनेत्रीचे नाव आहे आरुषी धोत्रे उर्फ 'हिरकणी'.

आरुषी धोत्रे ही मुळची सांगली जिल्ह्यातील पलूस या गावच असून लहानपणापासून तिला साहसदृश्यांची आवड होती. चित्रपटसृष्टीत जाण्याचे ठरविल्यानंतर ति ने प्रथम मॉडेलिंग केले. त्यानंतर तिने अनेक 'जाहिराती' तसेच 'फॅशन शो' मध्ये चमकली. याच दरम्यान तिने दक्षिणेकडील काही लघुपटात कामही केले.

चित्रपटासाठी 'साहसी दृश्य' करायला सोपे जावे म्हणून आरुषीने 'मार्शल आर्ट', 'बॉक्सिंग', 'ज्युडो' तसेच स्विमिंगचेही प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. मराठीमध्ये 'उन्मत्त' या आगामी चित्रपटासाठी दिग्दर्शक महेश राजमाने यांना 'साहसदृश्ये' करणारी अभिनेत्री पाहिजे होती. त्यांनी तिला विचारल्यावर आरुषीने त्यांना होकार दिला. या चित्रपटात तिला आता महत्वाची भूमिका मिळाली असून या चित्रपटातील साहसदृश्यांसाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे. 'उन्मत्त' हा 'एक्शनपट' असून '२४एफ एस चित्र' तर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होत आहे.

--------------------------

------------------