Sign In New user? Start here.
Asha Bhosale sings a Lavani for Marathi film 'Gurukul' गामी मराठी चित्रपट ‘गुरुकुल’मध्ये आशा भोसले यांच्या आवाजात एक झकास लावणी ऐकायला मिळणार आहे. फार कालावधी नंतर आशा भोसलेंच्या आवाजात एक अप्रतिम ठसकेबाज लावणी ऐकायला मिळणार आहे.
 
 
zagmag

आशा भोसले यांनी गायली ‘गुरुकुल’ ची लावणी

आगामी मराठी चित्रपट ‘गुरुकुल’मध्ये आशा भोसले यांच्या आवाजात एक झकास लावणी ऐकायला मिळणार आहे. फार कालावधी नंतर आशा भोसलेंच्या आवाजात एक अप्रतिम ठसकेबाज लावणी ऐकायला मिळणार आहे. चिरतरुण गायक असलेल्या आशाताई यांच्या आवाजात फार दिवासांनी मराठी प्रेक्षकांना मोठी पर्वणी मिळणार असल्याची भावना लेखक दिग्दर्शक रोमिल रोड्रीग्स यांनी व्यक्त केली.

एवढेच नव्हे तर ‘गुरुकुल’ साठी इतर गाणी सुद्धा दिग्गज गायक सुरेश वाडकर यांच्या सोबत सचिन पिळगावकर तसेच डॉक्टर नेहा राजपाल यांनी गायली आहेत. गाणी प्रशांत इंगोले यांनी लिहिली असून संजय राज गौरीनंदन यांनी संगीत दिले आहे. नागेश भोसले यांना एका आगळ्या वेगळ्या लुक मध्ये पाहण्याची संधी गुरुकुल’ निमित्ताने प्रेक्षकांना मिळणार असून विद्याधर जोशी असल्याने दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवायला मिळेल.

या चित्रपटात प्रशांत मोहिते, प्रदीप कुंवर, स्वप्नील जोशी, सोनाली शेवाळे, नेहा खान, रींना, आसीत रेडीज , उमेश बोळके, अनिल सुतार यांचाही महत्व पूर्ण भूमिका या चित्रपटात आहे. प्रीती सदाफुले हिने लावणीवर आपली अदाकारी पेश केली आहे. अनिल काबरा सदर चित्रपट वितरीत करीत असून ‘अ नट्स एन बोल्ट्स प्रोडक्षंस’ निर्मित ‘गुरुकुल’ हा चित्रपट येत्या ७ ऑगस्ट २०१५ रोजी सर्व महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

 

------------------