Sign In New user? Start here.
ashok samarth preforming bharud in viti dandu marathi movie निर्मात्या लीना देवरे यांच्या राजराधा मूव्हीज निर्मित आणि अजय देवगण फिल्म्स प्रस्तुत “विटी दांडू” या चित्रपटात रसिकांना अभिनेता अशोक समर्थ भारुड सादर करताना दिसेल.
 
 
zagmag

स्त्रीवेषात झळकणार अशोक समर्थ

भारुड ही कला कालबाह्य होऊ लागली आहे आणि ते सादर करणारे कलाकारही… अशा परिस्थितीत निर्मात्या लीना देवरे यांच्या राजराधा मूव्हीज निर्मित आणि अजय देवगण फिल्म्स प्रस्तुत “विटी दांडू” या चित्रपटात रसिकांना अभिनेता अशोक समर्थ भारुड सादर करताना दिसेल. यासाठी अशोकने स्त्रीवेष धारण केला आहे. आजवर आपल्या भारदस्त आवाजात संवादफेक करताना पाहिलेल्या अशोकला आता स्त्रीवेषात भारुडच्या तालावर ठेका धरताना पाहण्याची संधी “विटी दांडू” त लाभणार आहे. पारतंत्र्याच्या जोखडाखाली दबले गेल्याने विचार आणि आचाराने गांजलेल्या समाजमनाला नवी उभारी देण्यासाठी तसेच त्यांच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी या चित्रपटात अशोक भारुड सादर करतो.

“गेला माझा इंग्लिश सासरा गेला…” असे या भारुडाचे बोल असून गीतकार मानवेल गायकवाड यांनी हे भारुड रचलं आहे. संगीतकार संतोष मुळेकर यांनी त्यावर स्वरसाज चढवून मानवेल गायकवाड आणि पंढरीनाथ कांबळे यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलं आहे. नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे यांनी या भारुडाची कोरिओग्राफी केली आहे. ब्रिटिशकालीन राजवटीतील पारतंत्र्यातील आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वातंत्र्यातील असं दुहेरी वातावरण या चित्रपटात आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असलेला भारत स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली तर काहींनी लोकरंजनाच्या माध्यमातून समाजाच्या मनामनात क्रांतीची ज्योत प्रज्वलीत केली. अशोक समर्थवर चित्रीत करण्यात आलेलं “विटी दांडू” मधील भारुडही जनतेत जागृत करण्याचं काम करतं.

लोककला ही सर्व कलांची आद्यगुरू असूनही आजच्या काळातील कलांमध्ये लोककलांना स्थानच उरलेलं नाही. कुंभार ज्याप्रमाणे मातीला घडवून मडके बनवतो तशी लोककला कलाकार घडविण्याचं काम करते, परंतु आज लोककलाच लोप पावत असल्याचं खेदानं म्हणावं लागतं. माझ्यासारख्या कलाकाराला जेव्हा जेव्हा लोककला सादर करण्याची संधी मिळते, तेव्हा तेव्हा हिरीरीने पुढे येतो. “विटी दांडू” चित्रपटाने भारुड सादर करण्याची सुवर्णसंधी दिली. आजच्या पिढीला भारुड हा प्रकार कदाचित माहित नसेल, पण “विटी दांडू” मध्ये तो त्यांना नक्कीच पाहायला मिळेल, असं मत अभिनेता अशोक समर्थने व्यक्त केलं.

 

------------------