Sign In New user? Start here.
romantic chemistry of spruha and umesh"अवधूतच्या आवाजात रेकॉर्ड झाले 'यारी दोस्ती'चे प्रमोशनल सॉंग"
 
 
zagmag

अस्मिता-अभिचा झाला साखरपुडा

मराठी टेलिव्हिजनवरील ‘रील लाइफ’ जोडी आता ‘रिअल लाइफ’ जोडी बनली आहे. ‘अस्मिता’ या मालिकेत खासगी गुप्तहेराची भूमिका साकारणारी मयुरी वाघ आणि त्याच मालिकेत तिच्या पतीची म्हणजेच अभिजीतची भूमिका करणारा पियुष रानडे यांचा नुकताच साखरपुडा झाला.

मालिका तसेच चित्रपटात  एकमेकांसोबत काम करता करता कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडल्याची अनेक उदाहरणे आहेत.अस्मिता-अभिची मालिकेतील ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची आणि ख-या आयुष्यातही त्यांची जोडी असावी असंही अनेकांना वाटायचं. मयुरी-पियुषच्या चाहत्यांची ही इच्छा आता खरी झाली असून त्या दोघांनी आता आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांची ही आवडती जोडी पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहे.

------------------