Sign In New user? Start here.
bahou kadam perfoeming item song नुकतेच या चित्रपटातील ‘लाल लाल..रेशमी रुमाल’ या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. भाऊ कदम आणि विनोद हे समीकरण सर्वश्रुत आहे, पण प्रथमच या आयटम सॉगच्या माध्यमातून भाऊ कदम ‘लाल लाल..रेशमी रुमाल’ या गाण्यावर थिरकले आहेत.
 
 
zagmag

‘लाल लाल..रेशमी रुमाल’ या गाण्यावर थिरकणार भाऊ कदम

चॅनल यु इंटरटेनमेंट प्रस्तुत, आतिफ खान निर्मित, आर विराज दिग्दर्शित ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ हा नवीन चित्रपट येऊ घातला आहे. हा सिनेमा विनोदी ढंगाचा आहे.नुकतेच या चित्रपटातील ‘लाल लाल..रेशमी रुमाल’ या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. भाऊ कदम आणि विनोद हे समीकरण सर्वश्रुत आहे, पण प्रथमच या आयटम सॉगच्या माध्यमातून भाऊ कदम ‘लाल लाल..रेशमी रुमाल’ या गाण्यावर थिरकले आहेत. गिरीजा जोशी सोबत भाऊ कदम यांची केमेस्ट्री उत्तम जुळून आली आहे आणि आरती सोलंकी, चिन्मय उदगीरकर यांची त्यांना साथ लाभली आहे.या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी केले आहे. भाऊ कदम, गिरीजा जोशी, आरती सोलंकी, चिन्मय उदगीरकर या सर्व कलाकारांवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.

हे गीत मंदार चोळकर यांनी लिहिले असून प्रफुल कार्लेकर यांनी संगीत दिले आहे तर प्रविण कुंवर यांनी या गाण्याला स्वरबद्ध केले आहे. नेहमीच्या परिघाबाहेर असलेला कथाविषय, प्रेक्षकांना ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ या चित्रपटात पाहता येणार आहे. भाऊ कदम, राजेश भोसले, चिन्मय उदगीरकर, संजय मोहिते, गिरीजा जोशी, आरती सोलंकी आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद बाळ-अमोल यांची असून सह निर्मात्याची भूमिका हेमंत अणावकर यांची आहे, तर मंगेश जगताप कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत आहेत.

या चित्रपटातील गीते मंदार चोळकर, हरिदास कड यांनी लिहिली असून प्रफुल कार्लेकर आणि मधु कृष्णा यांनी संगीतबद्ध केले आहेत. अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, प्रविण कुंवर, रोहित राऊत, आनंदी जोशी, रेश्मा सोनावणे यांनी या चित्रपटातील गाण्यांना स्वरबद्ध केले आहे. छायांकन अंकुश बिराजदार यांचे असून नृत्य दिग्दर्शन महेश चव्हाण, सुजित कुमार यांचे आहे तर कला दिग्दर्शनाची जबाबदारी राज सांडभोर यांची आहे.

 

------------------