Sign In New user? Start here.
romantic chemistry of spruha and umesh"निळू फुलेंच्या प्रसिध्द डायलॉगवर आधारित गाणं "बाई वाड्यावर या"
 
 
zagmag

निळू फुलेंच्या प्रसिध्द डायलॉगवर आधारित गाणं "बाई वाड्यावर या"

बाई वाड्यावर या’ हा ज्येष्ठ अभिनेता निळू फुलेंचा प्रसिद्ध डायलॉग गाण्यात शीर्षक-शब्द वापरून एक धमाल गाणे तयार करण्यात येणार आहे याची चर्चा सर्वत्र होत आहे कारण या गाण्यात  मानसी नाईक बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. मानसी नाईक नेहमीच बोल्डलूक मध्ये दिसते यामध्ये तिचा लूक नेहमीप्रमाणॆ हटके दिसत आहे.

‘जलसा’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यावर अभिनेत्री मानसी नाईकने नृत्य सादर केले आहे. मानसी सोबत आशुतोष राज आणि निखिल वैरागर हे या गाण्यात थिरकताना दिसत आहे. आनंद शिंदे यांनी आपल्या दमादार आवजात हे गीत गायल असून समीर साप्तीसकर यांनी संगीतबध्द केलं आहे. ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यातून उत्तुंग कलाकार निळू फुलेंना आदराने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

निळू फुले, यांनी लोकनाट्यापासून अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली आणि चित्रपटातही दमदार अभिनय करत प्रेक्षकांना आपलेसे केले. खरं तर त्यांनी व्हिलनच्याच भूमिका जास्त केल्या तरीही त्यांचा स्त्री-चाहता वर्ग खूप मोठा होता.

 

------------------