Sign In New user? Start here.
A.v.prafull song chandu shikari टाइमपास व बालक पालक हे दोनही चित्रपट आता तमिळ आणि तेलगु भाषेत चित्रित होणार आहेत.या बाबतची पोस्ट रवी जाधव यांनी सोशल नेटवर्किंग साईट वर टाकली आहे
 
 
zagmag

रवी जाधव यांच्या चित्रपटांचा आता दक्षिण भाषेत रिमेक

रवी जाधव यांच नाव घेताच डोळ्यासमोर येतात ते वेगवेगळ्या विषयांना घेऊन केलेले हीट चित्रपट. खर तर मराठी चित्रपटसृष्टीत हीट चित्रपटांची जी रांग लागली आहे त्याची परत सुरवात रवी जाधव यांनी केली असे म्हंटले तर वावग ठरणार नाही. रवी जाधव यांचे चित्रपट आता परभाषियांनाही आकर्षित करत आहे.

अनेक हिंदी कलाकार मराठी चित्रपटांच्या निर्मितीकडे वळत आहे. पण ज्याप्रकारे दक्षिणेतील चित्रपटांच हिंदीमधे रिमेक होतो. आता त्याच प्रकारे मराठी चित्रपटांच दक्षिण भाषेत रिमेक होणार आहे. आर्श्चय वाटलं ना? पण हे खर आहे. टाइमपास व बालक पालक हे दोनही चित्रपट आता तमिळ आणि तेलगु भाषेत चित्रित होणार आहेत.या बाबतची पोस्ट रवी जाधव यांनी सोशल नेटवर्किंग साईट वर टाकली आहे.

रवि जाधव:- टाइमपास व बालक-पालक हे दोनही मराठी चित्रपट आता तामिळ व तेलगु भाषेत चित्रित होत आहेत. तुमच्या प्रमाणे मी सुद्धा ते पहाण्यास उत्सुक आहे. मराठी सिनेमा भारतातील वेगवेगळ्या भाषेत तयार होणे हे खूपच सुखावह आहे!!! एवढे दिवस हिंदी चित्रपटसृष्टित दक्षिणेतील चित्रपटांचे रिमेक होत होते. पण मराठी भाषेतील चित्रपटांच द्क्षिण भाषेत रिमेक होने ही बहुदा पहिलीच वेळ असावी.

 

------------------