Sign In New user? Start here.
bhushan and sanskruti 's new film "निवडुंग मध्ये भूषण-संस्कृती प्रमुख भूमिकांमध्ये
 
 
zagmag

"निवडुंग मध्ये भूषण-संस्कृती प्रमुख भूमिकांमध्ये"

bhushan and sanskruti 's new film

मराठी चित्रपट आज ख-या अर्थाने ग्लोबल सिनेमा बनत आहे. दिग्दर्शकांकडून हाताळले जाणारे वेगवेगळे विषय याला कारणीभूत आहेत. केवळ आशय आणि विषयाच्या बाबतीतच नव्हे तर सादरीकरणाच्या बाबतीतही मराठी सिनेमा उजवा ठरत आहे. मराठीत सध्या शहरी, निमशहरी, ग्रामीण, राजकीय, ऎतिहासिक चित्रपटांसोबतच सामाजिक चित्रपटही बनत आहेत.सामाजिक आशय असलेल्या निवडुंग या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली.

भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. काही वर्षांपुर्वी टिव्हीवर गाजलेल्या पिंजरा या लोकप्रिय मालिकेनंतर ही जोडी निवडुंग या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील त्यांची सहकलाकार सारा श्रवण सुध्दा या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

bhushan and sanskruti 's new film

असून मीना शमीम फिल्म या बॅनरअंतर्गत निर्माते मुनावर शमीम भगत या सिनेमाची निर्मिती करीत आहेत. यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत काही यशस्वी निर्मितीनंतर मुनावर भगत आता मराठीकडे वळले आहेत. सामाजिक आशय असलेल्या या चित्रपटात एका वेगळ्या प्रकारची प्रेमकथाही पाहायला मिळेल या चित्रपटाची कथा मुनावर भगत यांनी लिहली असून महेंद्र पाटील यांनी पटकथा आणि संवाद लिहीले आहेत.

अस्ताद काळे, प्राजक्ता दिघे, शेखर फडके यांच्याही या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. शशिकांत मिना या सिनेमाचे सहदिग्दर्शक असून एकेन सेबास्टेन या सिनेमासाठी कॅमेरा हाताळणार आहेत. या सिनेमातील गीतांना संगीतकार रफिक शेख संगीतबध्द करणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवडुंग च्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले.

------------------------------------------.